आरोपीला फाशीसाठी पाठपुरावा करु
जत :
4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्त्या करण्यात आली, ही घटना जितकी दुर्दैवी व संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फसणारी आहे. पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या नराधमाला काही तासांत अटक करून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शिवाय येत्या 15 दिवसांत दोषारोपपत्र सादर केले जाईल, ही केस फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीस फाशीची शिक्षा होईल, यासाठी महिला आयोग पाठपुरावा करेल, अशी माहिती महिला आयोगाच्या राज्य अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.
करजगी प्रकरणाची राज्य महिला आयोगाने देखील गंभीर दखल घेतली आहे. त्याच अनुषंगाने अध्यक्षा ऊपाली चाकणकर यांनी शनिवारी सायंकाळी उमदी पोलीस ठाण्यात आढावा घेतला. तसेच पीडित कुटुंब व नातेवाईक, नागरिक, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी आ. गोपीचंद पडळकर, सुनील पवार, संजय तेली, उपा†वभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, सह. निरीक्षक संदीप कांबळे आदी उपस्थित होते.

चाकणकर म्हणाल्या, समाजात काही अशा विकृती आहेत, त्यांना वेळीच ठेचले पाहिजे. यासाठी आपण देखील सतर्क असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक कडक कायदे असणारे राज्य आहे. त्यामुळे या घटनेतील पीडित कुटुंबास न्याय मिळेल. महिला आयोग याचा पाठपुरावा करेल आणि आरोपीस फाशीच होईल. कारण अशा विकृती समाजात असायला नाही पाहिजेत. येथील पोलिसांना देखील योग्य त्या सूचना दिल्या आहेत. इथल्या पोलिसांनी गतीने तपास केला आहे. सबळ पुरावे उपलब्ध झाले आहेत.
यापूर्वी कोल्हापूरमधील खोची येथील असेल, मावळ मधील कोथुर्णे असेल किंवा वेल्हा मधील कातकरी समाजातील असेल, या ा†तन्ही घटनातील आरोपींना फाशीच्या ा†शक्षेसाठी राज्य मा†हला आयोगाने पाठपुरावा केला होता. या ा†तन्ही घटनेतील आरोपींना माननीय न्यायालयाने फाशी सुनावली होती. या घटनेतील नराधमाला जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करू, असेही चाकणकर यांनी स्पष्ट केले.