For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रसंगावधानामुळे धावत्या बसचा अपघात टळला

10:46 AM Jan 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रसंगावधानामुळे धावत्या बसचा अपघात टळला
Advertisement

एक्सल ब्लेड कट झाल्याने घडली घटना

Advertisement

कारवार : धावत्या केएसआरटीसी बसचा एक्सल ब्लेड कट झाल्याची घटना येथील हब्बुवाडा रस्त्यावर मंगळवारी घडली. तथापि, चालकाच्या प्रसंगावधानामुळे आणि नागरिकांच्या मदतीमुळे बस पलटी होण्यापासून वाचविण्यात आली. या घटनेत बसमधील कांही प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या असून त्यांना येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. केवळ सुदैवाने मोठी दुर्घटना टळल्याचे सांगण्यात आले. या घटनेबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, केएसआरटीसी बस येथून कारवार तालुक्यातील केरवडीकडे निघाली होती. या बसमधून 50 प्रवासी प्रवास करीत होते. यामध्ये महिला प्रवाशांचा भरणा अधिक होता. सदर बस हब्बुवाडा (कारवार) रस्त्यावरून निघालेली असताना बसचा पाठीमागील एक्सल ब्लेड कट झाला. त्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस पलटी होण्याच्या स्थितीत असताना चालकाने प्रसंगावधान दाखविले आणि नागरिकांच्या मदतीने बसला वेगवेगळ्या प्रकाराचे टेकू देऊन बस पलटी होण्यापासून वाचविण्यात आली. या घटनेमुळे बसमधील प्रवाशी भयभीत झाले होते. कारवार शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत. कारवार ते केरवडीपर्यंतचा रस्ता धोकादायक वळणाचा आहे हे माहीत असूनही नादुरुस्त स्थितीतील बस कशी काय सोडण्यात आली, असा प्रश्न उपस्थित करून वाहतूक मंडळाच्या विरोधात संतप्त नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला. या घटनेमुळे कारवार-कैगा रस्त्यावरील वाहतुकीत व्यत्यय निर्माण झाला होता.

9 प्रवासी असलेले क्वालीस वाहन पलटी

Advertisement

सदाशिवगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय हमरस्ता क्र. 66 वरील सदिच्छा हॉलजवळ गोव्याहून कारवारकडे निघालेले क्वालीस वाहन पलटी झाले. या वाहनामधून प्रवासी प्रवास करीत होते असे सांगण्यात आले. रस्त्यावरील बसलेल्या जनावरांना वाचविण्याच्या नादात ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. सदाशिवगड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :

.