६० व्या वर्षी हा अभिनेता करतोय डेटींग !
मुंबई
बॉलावूड परफेक्शनिस्ट 'अमिर खान'चा ६० वा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. त्याच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत अभिनेत्याने त्यांच्या तिसऱ्या जोडीदाराची मिडीयासमोर ओळख करून दिली. यावेळी आमिर खान म्हणाला, 'गौरी स्प्रेटसोबत जोडीदार म्हणून मी कटीबद्ध आहे.'
यावेळी गौरीबद्दल बोलताना आमीर खान म्हणाला, 'मी गौरीला २५ वर्षांपूर्वी पहिल्यांदा भेटलो होतो. माझी चुलत बहीण नुझहत खान द्वारे तिच्याशी संपर्कात आलो. आम्ही दोघांनी एक वर्षांपूर्वी डेटींग सुरू केली.' "भुवन को उसकी गौरी मिल ही गयी" असा विनोदही आमीर खानने लगान चित्रपटाचा संदर्भ देत केला.
पुढे आमीर म्हणाला, 'गौरी ही हिंदी चित्रपटाची फारशी चाहती नाही आहे. तिने नुकतेच माझे तीन चित्रपट पाहिले. "दिल चाहता है", "लगान" आणि "दंगल" हे पाहिल्यानंतर आता तिच्यासोबत तारे जमीन पर पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. कारण तो माझा दिग्दर्शकीय पहिला चित्रपट आहे. सध्या गौरी आमिर खान प्रॉडक्शनमध्ये काम करते.'
'गौरी बंगळुरुमध्ये राहते. तिचे आधी लग्न झाले होते. तिला सहा वर्षांचा मुलगा आहे. आणि तो अंशतः आयरिश आणि अंशतः तमिळ आहे.' आमिर आणि गौरी यांनी स्वतःला वचनबद्ध असल्याचे सांगत एक वर्षापेक्षा अधिक काळ हे नाते यशस्वीरित्या गुप्त ठेवल्यबद्दल हसत उघडपणे अभिनेत्याने सांगितले.
पत्रकार परिषदेदरम्यान आमीरने सांगितले, की त्याचे कुटुंबीय 'आम्हा दोघांसाठी खूप आनंदी आहेत आणि त्याची मुलेही गौरीशी जुळवून घेतात. तिच्यावर प्रेम करतात. मला वाटलं की, ही तुम्हाला तिला भेटण्याची ही एक चांगली संधी असेल, शिवाय आम्हाला खूप लपून राहावे लागणार नाही. तसेच ती काल रात्री शाहरुख खान आणि सलमान खान यांनाही भेटली.'
या पत्रकार परिषदेत आमिरला लग्नाविषयी विचारणा झाल्यावर तो म्हणाला. 'मला सध्या गौरीसोबत स्थैर्य वाटत आहे. मला वयाच्या ६० व्या वर्षी लग्न करणं शोभून येईल की नाही.'आमिर खानचे यापूर्वी दोनदा लग्न झाले आहे. त्याचे पहिले लग्न १९८६ मध्ये रीना दत्ताशी केले आणि २००२ पर्यंत त्यांचे लग्न चालले. त्यांना दोन मुले आहेत - ईरा आणि जुनैद. त्यानंतर २००५ मध्ये त्यांनी किरण रावशी लग्न केले; २०२१ मध्ये ते वेगळे झाले. त्यांना एक मुलगा आझाद हा मुलगा आहे.
आपल्या पूर्वाश्रमीच्या पत्नींबद्दल बोलताना, आमिर म्हणाला की 'त्यांच्याशी चांगले संबंध असल्याने तो "भाग्यवान" आहे. मी भाग्यवान आहे, की माझी नाती मजबूत राहतात. रीना आणि मी १६ वर्षे एकत्र घालवली, आणि नंतर किरण आणि मी १६ वर्षे एकत्र घालवली, आणि अनेक प्रकारे आम्ही अजूनही एकत्र आहोत. या नात्यांमधून मी खूप काही शिकलो आहे, त्यामुळे मी समृद्ध झालो आहे. गौरीसोबत, मला स्थिरावल्यासारखे वाटते.'