पश्चिम विभागीय मंडळाची 28वी बैठक होणार गोव्यात
06:14 AM Jul 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
त. भा. प्रतिनिधी
Advertisement
पणजी : पश्चिम विभागीय मंडळाची 28 वी बैठक येत्या दि. 7 सप्टेंबर रोजी गोव्यात होणार आहे. या विभागात गोवा, गुजरात, महाराष्ट्र, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव ही राज्ये व संघप्रदेशांचा समावेश आहे.
या बैठकीची तयारी करण्यासंदर्भात केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमीत शहा यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी पत्रव्यवहार केला असून मंडळाचे अध्यक्ष या नात्याने ते स्वत: आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित राहणारआहेत. त्यांच्यासह मंडळाचे स्थानिक सदस्य तसेच सल्लागार यांना या बैठकीत सहभागी होणार आहेत. बैठकीचे यजमान या नात्याने सर्व आवश्यक तयारी गोवा सरकार कडून करण्यात येणार आहे.
Advertisement
Advertisement