कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चाकरमान्यांवर 212 'गणपती स्पेशल'ची ‘कृपा’

10:41 AM Jul 19, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

खेड :

Advertisement

गणेशोत्सवात कोकण मार्गावर धावणाऱ्या नियमित गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाल्याने चाकरमान्यांच्या नजरा गणपती स्पेशल गाड्यांकडे खिळलेल्या असतानाच मध्य रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी गणपती स्पेशल गाड्यांच्या 212 फेऱ्या जाहीर करत सुखद धक्का दिला आहे. यात 5 नियमितसह 5 साप्ताहिक गाड्यांचा समावेश आहे. सर्व गाड्यांचे आरक्षण 24 जुलैपासून खुले होणार आहे. यातील 5 नियमित गाड्या 22 ऑगस्टपासून धावणार आहेत.

Advertisement

गणेशोत्सवात चाकरमानी लाखेंच्या संख्येने गावी दाखल होत असतात. गणेशोत्सवातील आरक्षण फुल्ल झाल्याने हजारो चाकरमानी प्रतीक्षा यादीवर होते. याचमुळे गणेशोत्सवात गाव गाठायचे कसे, याचीच चिंता चाकरमान्यांना सतावत होती. गणेशभक्तांच्या नजरा गणपती स्पेशल गाड्यांकडे रोखल्या होत्या. कोकण विकास समितीसह अखंड कोकण प्रवासी सेवा समिती व प्रवासी संघटनांकडूनही गणपती स्पेशलच्या फेऱ्या जाहीर करण्याचा आग्रह धरण्यात आला होता.

मध्य रेल्वेने अखेर गणपती स्पेशलच्या फेऱ्या जाहीर केल्याने गणेशभक्त सुखावले आहेत. 01151/01152 क्रमांकाच्या सीएसएमटी-सावंतवाडीच्या 22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीत नियमितपणे 40 फेऱ्या धावणार आहेत. 01153/01154 क्रमांकाच्या सीएसएमटी-रत्नागिरी स्पेशलच्या 22 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर तर परतीच्या प्रवासात 23 ऑगस्ट ते 9 सप्टेंबरदरम्यान नियमितपणे 36 फेऱ्या धावणार आहेत. 01167/01168 क्रमांकाच्या एलटीटी-सावंतवाडी स्पेशलच्या 22 ऑगस्ट ते 23 सप्टेंबरदरम्यान नियमितपणे धावणाऱ्या 36 फेऱ्यांचा समावेश आहे. 01171/01172 क्रमांकाच्या एलटीटी-सावंतवाडी स्पेशलच्या 22 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरदरम्यान नियमितपणे 36 फेऱ्या धावणार आहेत. 01103/01104 क्रमांकाची सीएसएमटी-सावंतवाडी स्पेशल नियमितपणे 22 ऑगस्ट ते 9 सप्टेंबरदरम्यान धावेल. स्पेशलच्या 36 फेऱ्यांचा समावेश आहे.

01185/01186 क्रमांकाची एलटीटी-मडगाव साप्ताहिक स्पेशल 27 ऑगस्ट आणि 3 सप्टेंबरदरम्यान धावेल. 01165/01166 क्रमांकाची एलटीटी-मडगाव साप्ताहिक स्पेशल 26 ऑगस्ट, 2 आणि 9 सप्टेंबरदरम्यान धावेल. स्पेशलच्या 6 फेऱ्यांचा समावेश आहे. 01447/01448 क्रमांकाची पुणे-रत्नागिरी साप्ताहिक स्पेशल 26 ऑगस्ट, 2 व 9 सप्टेंबरदरम्यान धावेल. या स्पेशलच्याही 6 फेऱ्यांचा समावेश आहे. 01129/01130 क्रमांकाची एलटीटी-सावंतवाडी साप्ताहिक स्पेशल 26 ऑगस्ट, 2 आणि 9 सप्टेंबरदरम्यान धावणार आहे. या 10 गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण 24 जुलैपासून खुले होणार असल्याने आरक्षित तिकिटांसाठी चाकरमान्यांची झुंबड उडणार आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article