For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

19 वी आयपीएल स्पर्धा 28 मार्चपासून

06:22 AM Feb 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
19 वी आयपीएल स्पर्धा 28 मार्चपासून
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

2026 सालातील 19 वी आयपीएल क्रिकेट स्पर्धा 28 मार्च ते 31 मे दरम्यान होणार असल्याची घोषणा बीसीसीआयने केली.

गेल्या डिसेंबर महिन्यात 2026 ची आयपीएल क्रिकेट स्पर्धा 26 मार्चपासून सुरू होईल, अशी सूचना आयपीएल स्पर्धा आयोजकांनी संबंधित संघांच्या फ्रांचायझींना दिली होती. पण आयपीएलने त्यात बदल केला असून स्पर्धेची सुरुवात आता 28 मार्चपासून होईल तर अंतिम लढत 31 मे रोजी होणार आहे. या आयपीएल हंगामातील स्पर्धेचे वेळापत्रक निश्चित करण्यासाठी आयपीएलच्या नियंत्रण समितीची बैठक पुढील आठवड्यात बोलाविण्यात आली आहे. आसाम, प. बंगाल, तामिळनाडू या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने आयपीएल स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल होवू शकतो. अद्याप या राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात आरसीबी संघ खेळणार असल्याने त्या सामन्याच्या ठिकाणाबाबत आयपीएल जीसी चर्चा करून निर्णय घेणार आहे.

Advertisement

2025 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळविणाऱ्या बेंगळूरच्या आरसीबी संघाच्या विजयासाठी गेल्या जून महिन्यात चिन्नास्वामी स्टेडियमवर आयोजित केलेल्या समारंभामध्ये चेंगराचेंगरी झाल्याने 11 जणांना आपले जीव गमवावे लागले होते. त्यामुळे 2026 च्या आयपीएल स्पर्धेतील सामने चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळविण्याबाबत साशंकता व्यक्त केली होती. पण कर्नाटक राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी आरसीबी फ्रांचायझींनी चर्चा केली आणि त्यानंतरच आरसीबी संघाचे घरच्या मैदानावरील सात सामने चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळविले जातील, असे सांगण्यात आले. जर चिन्नास्वामी स्टेडियमवर हे सामने खेळविण्यास नकार दिल्यास तर हे सामने दुसऱ्या ठिकाणी हलविले जातील. त्यामुळे आरसीबीने या सामन्यांसाठी नवी मुंबई, रायपूर आणि पुणे या केंद्रांना पसंती दिली आहे.

कोलकाता व चेन्नई हे केकेआर व चेन्नई सुपर किंग्स यांचे होम ग्राऊंड असेल तर राजस्थान रॉयल्ससाठी गुवाहाटी हे होम ग्राऊंड असेल.

Advertisement
Tags :

.