12 दिवसांचे युद्ध आणि याचा प्रभाव
इराण अण्वस्त्रनिर्मितीच्या नजीक पोहोचल्याचा दावा करणाऱ्या आंतरराष्ट्रीय आण्विक ऊर्जा संस्थेच्या अहवालानंतर इस्रायलने हे अभूतपूर्व हल्ले केले होते. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल इराणने इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्रs डागत ड्रोन हल्ले केले होते, यातील बहुतांश हल्ले इस्रायलच्या आयर्न डोम प्रणालीने हाणून पाडले होते. तर रविवारी अमेरिकेने ‘ऑपरेशन मिडनाइट हॅमर’ राबविल्यावर या संघर्षाला निर्णायक वळण मिळाले. या हल्ल्यात इराणच्या तीन प्रमुख आण्विक केंद्रांवर अमेरिकेने ‘बंकर-बस्टर’ बॉम्ब पाडविले होते. या अभूतपूर्व हल्ल्याच्या 48 तासांच्या आतच शस्त्रसंधी झाली आहे. संघर्षात प्रवेश करण्याचा ट्रम्प यांचा अतिजोखिमीचा निर्णय बहुधा यशस्वी होताना दिसून येत आहे. परंतु युद्धामुळे माठे नुकसानही झाले आहे. इराणमध्ये इस्रायलच्या हल्ल्यात सुमारे 600 लोक मारले गेले आहेत. तर एका मानवाधिकार समुहाने हल्ल्यांमधील बळींची संख्या 950 असल्याचा दावा केला आहे. इस्रायली शहरांवरील इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे 24-30 जणांना जीव गमवावा लागला आहे.