महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दहावीचा निकाल १० मे ला जाहीर होण्याची शक्यता

03:30 PM Apr 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दहावीचा निकाल २०२४ लवकरच  कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ (KSEAB) द्वारे जाहीर केला जाईल. सूत्रांनुसार, १० मे पर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे, मात्र, बोर्डाकडून अधिकृत दुजोरा मिळण्याची प्रतीक्षा आहे. दहावीचा निकाल २०२४ विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट kseab.karnataka.gov.in किंवा karresults.nic.in वर प्रवेश करून पाहता येईल. कर्नाटकात यंदा सुमारे ८.९ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. दहावीच्या परीक्षा २५ मार्च ते ६ एप्रिल २०२४ या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. संपूर्ण राज्यात सुमारे २,७४७ परीक्षा केंद्रे तयार करण्यात आली होती. दहावीचा परीक्षा २०२४  मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांनी थिअरी परीक्षांमध्ये १५० पैकी किमान ४० गुण आणि प्रात्यक्षिक परीक्षेत ५० पैकी ३० गुण प्राप्त केले पाहिजेत. उमेदवाराला एकूण ३५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. जे या अटींमध्ये बसत नाहीत त्यांना निकाल जाहीर झाल्यानंतर जाहीर होणारी कंपार्टमेंट परीक्षा द्यावी लागेल. २०२३ मध्ये, 10वीच्या परीक्षा गेल्या वर्षी ३१ मार्च ते १९ जून या कालावधीत झाल्या होत्या आणि निकाल ८ मे रोजी जाहीर झाला होता. २०२२ मध्ये २८ मार्च ते ११ एप्रिल या कालावधीत परीक्षा घेण्यात आल्या होत्या आणि निकाल मे रोजी जाहीर करण्यात आला होता.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#kseeb.kar.nic.in#sslc_result#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article