For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांदा उड्डाणपुलाजवळील ''तो'' खड्डा बुजविला

10:54 AM Jan 04, 2026 IST | अनुजा कुडतरकर
बांदा उड्डाणपुलाजवळील   तो   खड्डा बुजविला
Advertisement

माजी उपसरपंच जावेद खतीब व बाळू सावंत यांचा पुढाकार

Advertisement

प्रतिनिधी
बांदा

येथील उड्डाणपुलाजवळ महामार्गाच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून काल एका बँक कर्मचारी युवती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. हा प्रकार घडल्यानंतर माजी उपसरपंच जावेद खतीब व बाळू सावंत यांनी याची तात्काळ दखल घेत आज सकाळी संबंधित खड्डा बुजवून संभाव्य अपघात टाळण्यासाठी पुढाकार घेतला.सदर खड्डा रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना स्पष्टपणे दिसत नसल्याने तो अत्यंत धोकादायक ठरत होता. काल सायंकाळी उशिरा बँक कर्मचारी युवती आपल्या घरी जात असताना अचानक या खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाली होती. घटनेनंतर नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत होता आज सकाळीच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत खड्डा बुजविण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी मनसे तालुकाप्रमुख मिलिंद सावंत, माजी सरपंच अशोक सावंत, विकी केरकर, माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश विरनोडकर आदी उपस्थित होते. महामार्गाच्या कामादरम्यान सुरक्षिततेच्या उपाययोजना न केल्यास अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता असल्याने संबंधित यंत्रणांनी वेळीच खबरदारी घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.