For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Crime | कोल्हापूर CBS वरील 'ती' महिला चोर अखेर गजाआड; पुणे कनेक्शन पाहून पोलीसही चक्रावले!

01:14 PM Jun 01, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur crime   कोल्हापूर cbs वरील  ती  महिला चोर अखेर गजाआड  पुणे कनेक्शन पाहून पोलीसही चक्रावले
Advertisement

                                      कोल्हापूर बसस्थानकातील दागिने चोरी प्रकरणी महिलेला अटक

Advertisement

कोल्हापूर - कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्टॅन्डवर गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने चोरी करणाऱ्या सविता गोविंद अवताडे (वय ४०, रा. मुळ गांव आष्टा कासार ता. लोहारा, जि. धाराशिव. सध्या रा. रुम नं. ३ अरविंद कॉम्प्लेक्स बी विंग हिंगणे, सिंहगड रोड, पुणे) या महिलेस स्थानिक गुन्हे अन्वेषणने ताब्यात घेऊन अटक केली आहे.

तिच्याकडून २७.५४० ग्रॅम वजनाचे २ लाख ८९ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, २४ रोजी गर्दीचा फायदा घेत अडीच लाखांचे दागिने अज्ञाताने चोरल्याची तक्रार शाहुपुरी व लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. घटनेत चोरी करणारी महिला सीसीटीव्हीतकैद झाली होती.

Advertisement

या गंभीर घटनेची दखल घेऊन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना गुन्हयाचा समांतर तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अमंलदार युबराज पाटील, अमित सर्जे, शुभम संकपाळ, विशाल चौगुले यांचे पथक तयार करुन समांतर तपास सुरु केला होता.

सदरची चोरी ही रेकॉर्डवरील महिला आरोपी सविता अवताडे (रा. सिंहगड रोड पुणे) हिने केला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने दि. ३० मे रोजी पुणे येथुन सविता गोविंद अवताडे या महिलेला पुण्यातील राहत असलेल्या घरातून ताब्यात घेतले. तिच्याकडे अधिक चौकशी केली असता तिने २४ मे रोजी कोल्हापूर येथे एस. टी. बसमध्ये गर्दीचाफायदा घेवून दोन महिलांचे दागिने चोरल्याची कबुली दिली.

तिच्याकडुन २ लाख ८९ हजार ८०० रुपये किंमतीची एकूण २७.५४० ग्रॅमची दोन सोन्याची मंगळसूत्र जप्त केली. सविता गोविंद अवताडे ही मुळची उस्मानाबादची असून यापूर्वी तिच्यावर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यात पुणे ग्रामीण, सांगली, सातारा व कोल्हापुरात जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात अंबाबाई मंदिरातील चोरीचा गुन्हा दाखल आहे.

Advertisement
Tags :

.