For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kurundwad | मजरेवाडी-बस्तवाड रस्त्यावरील 'तो' वादग्रस्त वटवृक्ष अखेर हटवला; रस्ते सुरक्षेसाठी ग्रामपंचायतीचा मोठा निर्णय

01:37 PM Apr 08, 2026 IST | NEETA POTDAR
kurundwad   मजरेवाडी बस्तवाड रस्त्यावरील  तो  वादग्रस्त वटवृक्ष अखेर हटवला  रस्ते सुरक्षेसाठी ग्रामपंचायतीचा मोठा निर्णय
Advertisement

                      कुरुंदवाड परिसरात जुना वटवृक्ष जमीनदोस्त

Advertisement

कुरुंदवाड - मजरेवाडी–बस्तवाड–अकिवाट तिहेरी रस्त्यावर असलेल्या वादग्रस्त वडाच्या झाडाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, मजरेवाडी ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामात अडथळा आणू नये असा निर्णय घेतल्यानंतर मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून झाड तोडण्याची कारवाई करण्यात आली. दिवसभर सुरू असलेल्या कामानंतर संबंधित वटवृक्ष पूर्णतः हटवून रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले.
यापूर्वी या झाडावरून मजरेवाडी व बस्तवाड ग्रामस्थांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला होता.

अपघातांची संख्या वाढत असल्याने झाड तोडण्याची मागणी बस्तवाड ग्रामस्थांनी केली होती, तर सुमारे १५० ते २०० वर्षे जुने असलेल्या या वडाच्या झाडाशी धार्मिक व सांस्कृतिक भावना जोडल्या असल्याने मजरेवाडी ग्रामस्थांनी विरोध दर्शविला होता. दसरा महोत्सवासारखे पारंपरिक कार्यक्रम या ठिकाणी साजरे होत असल्याने झाड न तोडण्याची मागणी करण्यात आली होती.

Advertisement

या वादाच्या पार्श्वभूमीवर मजरेवाडी ग्रामपंचायतीची बैठक घेण्यात आली. रस्ते सुरक्षेचा प्रश्न आणि वाढते अपघात लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामात अडथळा करू नये, असा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला. या निर्णयानंतर विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत झाड तोडण्यास सुरुवात केली.

मंगळवारी सकाळी क्रेन व कटरच्या सहाय्याने झाडाच्या फांद्या कापण्यात आल्या. त्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण झाड हटवून रस्ता मोकळा करण्यात आला.सदर कारवाईनंतर रस्त्यावरील दृश्यमानता सुधारण्यास मदत होणार असून अपघातांचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, झाड तोडण्याच्या निर्णयामुळे काही ग्रामस्थांमध्ये नाराजी कायम असल्याचेही दिसून आले. प्रशासनाने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यायी वृक्षारोपण करावे, अशी मागणीही यावेळी पुढे आली आहे.

Advertisement
Tags :

.