Sangli News | विहिरीतून वर येणारा 'तो' डबा अचानक पुन्हा तळात जाऊन आदळला अन्...; तासगाव जवळील पाडळीतील घटनेने खळबळ!
तासगावमध्ये भीषण दुर्घटना! विहिरीत यारीचा डबा कोसळला
तासगाव : तासगाव तालुक्यातीलपाडळी येथे विहिरीचे काम सुरू असताना विहिरीतून यारीचा लोखंडी डब्यातून वर येत असताना नंतर पुन्हा जोरात विहिरीच्या तळात जावून आपटल्याने यारीच्या लोखंडी डब्यातील एकाचा मृत्यू झाला. तर इतर पाचजण जखमी झाले. याप्रकरणी यारी मालक व चालक या दोघांविरूध्द तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये महादेव आत्माराम पाटील (वय ६५, रा.धामणी, ता.तासगाव) है मयत झाले आहेत. तर संजय जनार्दन शिंदे, धनाजी दशरथ पाटील, मोहन पांडुरंग पाटील, उमेश प्रल्हाद पाटील, विक्रम बाबुराव गुरव सर्व रा. धामणी हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी बबन आत्माराम पाटील (रा.धामणी) यांनी यारी मालक विनोद संपत सुर्वे, यारी चालक विजय आकाराम पाटील दोघे (रा.धामणी) यांच्याविरूध्द फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी यांचे भाऊ महादेव पाटील हे गावातील विनोद सुर्वे यांच्या यारीवरती कामाला जात होते. सध्या त्यांचे पाडळी (ता. तासगाव) येथील ज्ञानेश्वर प्रभाकर पाटील यांच्या विहिरीचे खोदकाम चालू असलेने महादेव पाटील तसेच गावातील संजय शिंदे, धनाजी पाटील, मोहन पाटील, उमेश पाटील, विक्रम गुरव हे सुर्वे यांचे मालकीचे यारीवर कामाला जात होते. या यारीबर बिजय पाटील हे चालक म्हणून काम करीत होते.
दि.१९ मे २०२५ रोजी सकाळी ८ चे दरम्यान मयत महादेव पाटील व इतर पाच जण ज्ञानेश्वर पाटील यांचे विहिरीचे खोदकाम करणेकरिता बिनोद सुर्वे यांचे मालकीचे यारीवर कामाला गेलेचे फिर्यादी यांनी पाहिले होते. सायंकाळी फिर्यादी घरी असताना त्यांचा मुलगा अवधुत याने फोन करून सांगितले की, महादेव पाटील व इतर पाचजण सकाळी ८.३० वा. चे सुमारास विहिरीत उतरून दुपारी १२.३० वा.चे पर्यंत काम करून जेवण करण्यासाठी यारीच्या सहाय्याने लोखंडी डब्यात बसून बिहिरीतून बरती येत होते.
त्यावेळी यारी चालक विजय आकाराम पाटील यांनी यारीहलगर्जी, निष्काळजी हाताळल्याने यारीचा लोखंडी डबा विहिरीतून वर आल्यानंतर तो पुन्हा जोरात विहिरीच्या तळात जावून आपटला, त्यावेळी यारीच्या लोखंडी डब्यातून सर्वजण बाजूला पडून जखमी झाले. फिर्यादी यांचे भाऊ यांचे दोन्हीहाताला व डाव्या पायाला, पोटाला,तसेच छातीला मुक्कामार लागून रक्तयेत होते.
संजय शिंदे यांच्या कमरेच्याखाली दोन्ही पायाला मार लागून गंभीरदुखापत झाली. धनाजी पाटील यांनाकिरकोळ मुक्कामार, मोहन पाटीलयांचे दोन्ही पाय मोडलेले, उमेशपाटील यांना किरकोळ, विक्रम गुरब यांना किरकोळ स्वरूपाची दुखापतझाली.
यापैकी महादेव पाटील, मोहन पाटील, संजय शिंदे, धनाजी पाटील या चौघांना मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. व विक्रम गुरव व प्रल्हाद पाटील विटा येथे उपचारास दाखल करण्यात आले. महादेव पाटील यांच्यावर आयसीयू विभागात उपचार चालू होते. उपचारा दरम्यान दि.२० मे रोजी मयत झाले.