महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

थापा, संजीत, पांघल अंतिम फेरीत

06:44 AM Dec 02, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ शिलाँग

Advertisement

येथे सुरू असलेल्या पुरुषांच्या राष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत शुक्रवारी अनुभवी मुष्टीयोद्धा शिवा थापाने 63 किलो गटात तर 2021 सालातील आशियाई चॅम्पियन संजीतने 92 किलो वजनगटात अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. त्याचप्रमाणे 51 किलो गटात अमित पांघलने अंतिम फेरी गाठली आहे.

Advertisement

पुरुषांच्या 63 किलो वजनगटातील शुक्रवारी झालेल्या उपांत्य लढतीत आतापर्यंत सहावेळा आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या अनुभवी शिवा थापाने महाराष्ट्राच्या हरीवंश तिवारीचा 5-0 अशा गुणाने एकतर्फी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. आता आसामच्या शिवा थापाची अंतिम लढत सेनादलाच्या वंशजशी होणार आहे.

पुरुषांच्या 92 किलो वजनगटातील उपांत्य लढतीत संजीतने हवाई दलाच्या विक्कीचा एकतर्फी पराभव करत अंतिम फेरी गाठली. सेनादलाच्या संजीतने या लढतीत आपल्या जबरदस्त ठोशावर जलद गुण वसूल केले. त्याचा अंतिम सामना हरियाणाच्या नवीनकुमारशी होणार आहे. या स्पर्धेत शुक्रवारी सेनादलाच्या 12 स्पर्धकांनी पुढील फेरीत स्थान मिळवले आहे. सेनादलाच्या अमित पांघलने 51 किलो वजनगटातील उपांत्य लढतीत अंकितचा 5-2 असा पराभव केला. आता सुवर्णपदकासाठी पांघलची लढत चंदिगडच्या अन्शुल पुनियाशी होणार आहे. सेनादलाच्या बारुन सिंगने 48 किलो गटात, पवनने 54 किलो गटात, सचिन 57 किलो गटात, आकाशने 60 किलो गटात, वंशजने 63.5 किलो गटात, रजतने 67 किलो गटात, आकाशने 71 किलो गटात, दीपकने 75 किलो गटात लक्ष्यने 80 किलो गटात तर जुगनूने 86 किलो गटात अंतिम फेरी गाठली आहे. 92 किलोवरील वजन गटात आरएसपीबीच्या सागरने अंतिम फेरीत प्रवेश मिळवताना दिल्लीच्या विशाल कुमारचा 5-0 असा फडशा पाडला. आता त्याची सुवर्णपदकासाठीची लढत पंजाबच्या जयपाल सिंगशी होणार आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#social media
Next Article