For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ठकसेन दीपश्री सावंतला न्यायालयीन कोठडी

12:42 PM Nov 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
ठकसेन दीपश्री सावंतला न्यायालयीन कोठडी
Advertisement

फोंडा : बेरोजगारांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून कोट्यावधी ऊपयांना गंडा घालणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधार संशयित दीप़श्री सावंत गावस हिची फोंडा प्रथम वर्ग न्यायालयाने 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. ‘जॉब स्कॅम’ प्रकरणात माशेल येथील शिक्षण संस्थेत नोकरी देण्याचे सांगून 10 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गजाआड केलेल्या आयआरबी पोलिस कॉन्स्टेबल सागर सुरेश नाईक व सुनिता पावस्कर यांना अटक केल्यानंतर दीपश्री सावंत गावस हिला फोंडा पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर माशेल येथील सरकारी अभियंता संदीप परब यांने आपण दीपश्रीला 3.88 कोटी ऊपये दिल्याची तक्रार दाखल केल्यानंतर तिच्या पोलिस कोठडीत वाढ झाली होती. फोंडा पोलिसांनी तिच्याकडून 2 दुचाकी व 3 आलिशान गाड्या मिळून एकत्रित सुमारे 40 लाख ऊपये किमतीची वाहने जप्त केलेली आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.