For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ठाकरे विरुध्द भाजप

06:44 AM Sep 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
ठाकरे विरुध्द भाजप
Advertisement

महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे विऊद्ध भाजप या संघर्षाला आता एक नवे वळण मिळताना दिसत आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांनी भाजपविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेतली आहे, तर दुसरीकडे राज ठाकरेही भाजपवर थेट हल्लाबोल करू लागले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आल्याने या संघर्षाचे राजकीय महत्त्व आणखी वाढले आहे. पुण्यातील अमित ठाकरे-पंतप्रधान नरेंद्र मोदी फोटो प्रकरणामुळे हा प्रश्न आता केवळ एका फोटोचा नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपसमोरचे आव्हान आता केवळ उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांच्यापैकी एकाचे राहिलेले नाही. तर महाराष्ट्राच्या राजकारणातील लढाई ‘ठाकरे विऊद्ध भाजप’ अशीच रंगण्याची शक्यता आहे.

Advertisement

उध्दव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडल्यानंतर राज ठाकरे आणि भाजप यांच्यातील राजकीय जवळीक महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय होती. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. ज्या राज ठाकरे यांनी भाजपला लोकसभा निवडणूकीसाठी बिनशर्त पाठिंबा दिला होता, तेच राज ठाकरे आता पेंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर, बेरोजगारी, अर्थव्यवस्था, शिक्षणाच्या प्रश्नांवरून भाजपला लक्ष्य करत आहेत.

रविवारी ठाण्यात झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाजपच्या धोरणांवर जोरदार टीका केली. ‘जेन-झी’च्या दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनानंतर मुंबईत ठाकरे बंधुंनी एकत्र मोर्चा काढला होता. यावेळी उध्दव ठाकरे, राज ठाकरे यांच्याबरोबरच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे अग्रभागी दिसले. ‘जेन-झी’च्या आंदोलनानंतर प्रत्येक राजकीय पक्षाने तरूणांना साद घालण्यास सुरूवात केली आहे,

Advertisement

अमित ठाकरे यांनी देखील पुण्यात काही नामांकित महाविद्यालयांना भेटी देताना एका महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोच्या बाजुला असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर आक्षेप घेताना, पंतप्रधानांचा फोटो तेथून काढायला लावला. त्यानंतर अमित ठाकरे यांच्या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली. पुण्यात अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, त्यातच भाजपच्या युवा मोर्चाने थेट ‘शिवतीर्थ’ या अमित ठाकरेंच्या घरावर धडकण्याची योजना आखली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजपची ही योजना हाणून पाडताना भाजपला प्रसाद देखील दिला. त्यामुळे कधी नव्हे ती भाजपा मुंबईत बॅकफुटवर आलेली बघायला मिळाली.

विशेष म्हणजे मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर भाजपच्या काही प्रवक्त्यांनी अमित ठाकरे तसेच मनसेवर टीका केली. यात विशेष बाब म्हणजे शिवसेना शिंदे गटाने राज ठाकरे यांच्या विरोधात तितकी आक्रमक भूमिका घेतली नाही. राजकारणात पक्ष नेतृत्वाने दिलेला आदेश पाळण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांचा पहिला नंबर लागतो. भाजपला मनसेच्या कार्यकर्त्यांनी जशास तसे उत्तर दिल्यानंतर शिवसेनेने जर या आंदोलनात उडी घेतली असती, तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना देखील मनसेकडून तसाच पाहुणचार झाला असता. त्यामुळे भाजपची झालेली नाचक्की बघता एकनाथ शिंदे यांनी शांततेची भूमिका घेतल्याचे दिसले, राज ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो सरकारी कार्यालयात असण्यास तत्त्वत: विरोध नसल्याचे सांगितले.

मात्र छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत कोणत्या क्रमाने आणि कोणाचे फोटो लावायचे, यावर त्यांनी आक्षेप घेतला. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना राज्यात मोदींच्या कार्याचे गुणगाण करणारे राज ठाकरे हे पहिले नेते होते. उद्धव ठाकरे यांचा भाजपविरोध नवीन नाही. भाजपचे हिंदुत्व हा तर उध्दव ठाकरेंचा सगळ्यात आवडीचा विषय. त्यात आता राज ठाकरे यांनी देखील हिंदुंच्या सणांवर बोलताना सण-उत्सव साजरा करा, मात्र धर्मांध होऊ नका, धार्मिक द्वेषाच्या माध्यमातून जनतेला मुख्य प्रश्नापासून दूर नेले जात असल्याची टीका केली.

‘जेन-झी’ च्या आंदोलनानंतर तऊण पिढी ही भाजपच्या विरोधात जाताना दिसत आहे. या पिढीला आपल्याकडे वळविण्यासाठी सगळ्याच पक्षाचे नेते कामाला लागले आहेत. काँग्रेसच्या राहुल गांधींनी पुण्यात कार्यक्रम घेतला, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांनी मुंबईत तऊणांशी संवाद साधला. राज्यात देखील मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न पुन्हा गाजणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात भाजपसमोर मोठे आव्हान आहे.

भाजपमध्ये पक्षप्रवेशाचे कार्यक्रमही कमी झाले आहेत. दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेशाचे रोज कार्यक्रम होताना दिसत आहेत. उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी देखील सभा आणि बैठकांचा सपाटा लावला आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपच्याच आशिर्वादाने

ऑपरेशन टायगर यशस्वी केले. मशाल चिन्हावर निवडून आलेले 6 खासदार शिंदे यांनी फोडल्याने, ठाकरे यांचे या खासदारांच्या जीवावर जे दिल्लीत वजन होते, ते देखील आता राहिलेले नाही. उबाठाकडे 10 आमदार आणि तीन खासदार असताना त्या तुलनेत एकही आमदार आणि खासदार नसलेला मनसे हा पक्ष भारी पडताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा संघर्ष केवळ भाजपविरोधाचा नाही, तर शिवसेनेची राजकीय ओळख आणि महाराष्ट्रातील आपला प्रभाव टिकवण्याचाही आहे.

दुसरीकडे राज ठाकरे यांच्यासाठी मनसेला पुन्हा राजकीय पेंद्रस्थानी आणण्याची ही संधी आहे. भाजपसाठी मात्र ही समीकरणे निश्चितच आव्हानात्मक आहेत. कारण ठाकरे बंधू वेगवेगळे असताना त्यांची राजकीय ताकद विभागली जात होती. महाराष्ट्राच्या राजकारणात समीकरणे क्षणाक्षणाला बदलतात. त्यामुळे ठाकरे बंधूंची एकजूट किती टिकते, ती निवडणुकीपुरती मर्यादित राहते की व्यापक राजकीय संघर्षाचे रूप घेते आणि त्याचा सर्वाधिक फायदा कोणाला होतो, हे आगामी काळात स्पष्ट होईल. बाळासाहेब ठाकरे यांनी देशात हिंदुत्वाच्या मुद्यावर निवडणूक जिंकता येते, हे विलेपार्ले विधानसभा पोटनिवडणूकीत दाखवून दिले. आता भाजपच्या हिंदुत्वाला राजकीय हिंदुत्व म्हणून लक्ष्य कऊन ठाकरे बंधू ठाकरे हिंदुत्व पुन्हा मांडणार का? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रवीण काळे

Advertisement
Tags :

.