लोकांचे प्रश्न अधांतरी ठेवणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांना चांगली बुद्धी दे
ठाकरे सेनेचे गाऱ्हाणे ; महाआरती करीत मळेवाड येथे आंदोलन
न्हावेली / वार्ताहर
वीज कंपनीच्या मनमानी कारभाराच्या विरोधात ठाकरे शिवसेनेकडून पुकारण्यात आलेल्या महाआरती आंदोलनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.यावेळी मळेवाड चौकातील गणेश मंदिरात ही आरती करुन याठिकाणी महावितरणच्या भोंगळ कारभाराचा निषेध करण्यात आला.यावेळी महावितरणचा निषेध असो उद्धव ठाकरे तुम आगे बढो,हम तुमारे साथ है ! अशा विविध घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी हे आंदोलन यशस्वी केले.यावेळी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.यावेळी मतदार संघातील लोकांचे प्रश्न अधांतरी ठेवणाऱ्या शासनासह वीज कंपनीला चांगली बुद्धी दे असे गाऱ्हाणे श्री चरणी घालण्यात आले.यावेळी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.तत्पूर्वी पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्या मध्ये वीज उपकेंद्रात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.परंतु त्यानंतर गणेश मंदिरात ही महाआरती करुन आंदोलन करण्यात आले.यावेळी त्याठिकाणी वीज अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. यावेळी मळेवाड,आरोंदा,आरोस,नाणोस पंचक्रोशीतील शेकडो ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते.यावेळी उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार,तालुकाप्रमुख मायकल डिसोजा,जिल्हा परिषद सदस्य राजन आबा केरकर,गुरुनाथ नाईक,नीलेश शिरसाट,बाळा रेडकर,रवि तळवणेकर,मुन्ना मुळीक,नंदू नाईक,प्रकाश राऊत,वासुदेव राऊळ,सचिन गावडे,नम्रता झारापकर,स्मिताली नाईक,शिल्पा नाईक,सुभद्रा नाईक,प्रशांत नाईक,बाळा आरोंदेकर,संतोष पेडणेकर,अनिल विर्नोडकर,संजय रेडकर,गोकुळदास मोठे,रामदास पेडणेकर,सारंग कोरगावकर,तुषार पालव,नितीन कांबळी,बबन राऊत,रविंद्र काजरेकर,रवी सावंत,अनिल जाधव,विलास परब,आदी ग्रामस्थ रिक्षा व्यवसायिक व मळेवाड चौकातील व्यापारीवर्ग उपस्थित होते.