आंबोली ग्रामपंचायतचे ठाकरे शिवसेनेचे सदस्य भाजपात
आंबोली । प्रतिनिधी
आंबोली ग्रामपंचायतचे ठाकरे शिवसेनेचे विद्यमान सदस्य काशीराम मालू राऊत यांनी आज भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदिप गावडे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांच्या सोबत भाजपात प्रवेश केला. प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत हा प्रवेश संपन्न झाला . भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पक्ष संघटना वाढीसाठी यापुढे सदैव कार्य करत राहू तसेच जनतेच्या हिताचे कार्य करण्यासाठी कायम कटिबद्ध प्रयत्नशील राहू. भाजपा पक्ष हा शिस्तीचा आणि पक्ष संघटनेच्या ध्येय धोरणाशी सदैव एकनिष्ठ असलेला पक्ष आहे. त्यामुळे अशा पक्षामध्ये काम करणे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे असे प्रतिपादन भाजपात प्रवेश केलेल्या काशीराम राऊत यांनी यावेळी केले .यावेळी भाजप सरचिटणीस महेश सारंग, मनोज नाईक, आंबोली मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ, आंबोली सरपंच सावित्री पालेकर, चौकूळ सरपंच गुलाबराव गावडे,गेळे सरपंच सागर ढोकरे, आंबोली मंडळ उपाध्यक्ष रामा गावडे,उपसरपंच दत्तू नार्वेकर, विजय गवस, बूथ अध्यक्ष, व अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते .