वेंगुर्लेत ठाकरे शिवसेनेची घरोघरी प्रचारात आघाडी
वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश निकम व १७ नगरसेवक उमेदवार संपूर्ण शहरात प्रभागवार नियोजन पद्धतीने प्रचार मोहिम राबवित आहेत. या प्रचारात ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह प्रभागातील स्थानिक मतदार नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. प्रचाराचा धडाका पाहता ठाकरे शिवसेनेने प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.ठाकरे शिवसेनेतर्फे प्रत्येक प्रभागात निवडणूक रिंगणात असलेल्या दोन उमेदवार व नगराध्यक्ष पदाचे उमेदवारांच्या प्रचाराचे नियोजन संदेश निकम हे करीत आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा चेहरा दिसून येत आहे.या प्रचारावेळी ठाकरे सेनेचे माजी शहर प्रमुख अजित राऊळ, उपतालुका प्रमुख संजय गावडे, माजी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, तसेच स्थानिक नगरसेवक पदाचे उमेदवार समिधा रेडकर, अक्षय जाधव आदींसह नागरिकही उपस्थित होते .