For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिरशिंगेत ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

12:22 PM May 04, 2024 IST | अनुजा कुडतरकर
शिरशिंगेत ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
Advertisement

सावंतवाडी | प्रतिनिधी

Advertisement

कोकणच्या विकासासाठी ज्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक रक्ताचा थेंब खर्ची केला. त्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पुन्हा लोकसभेत पाठविण्यासाठी शिरशिंगे गावातून नव्वद टक्के मतदान करा . यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला .त्यामुळे निश्चितपणे त्यांच्या समस्या दूर केल्या जातील आणि तुमच्या भागाचा विकास केला जाईल असे आवाहन युवा उद्योजक तथा भाजपाचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरशिंगे गावात भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक श्री परब यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी उबाठा सेनेतील कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी व्यासपीठावर सरपंच दिपक राऊळ, उपसरपंच सचिन धोंड, जिल्हा बॅक संचालक रविद्र मडगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरी राऊळ, पुंडलिक कदम, केतन आजगावकर, जेष्ठ ग्रामस्थ नारायण राऊळ आदी उपस्थित होते.श्री परब पुढे म्हणाले,निवडणुका या पाच वर्षांनी येतात आणि जातात शिंरशिंगे गावात मागील काही वर्षांची परिस्थिती पाहता येथे साधे पक्के रस्ते नव्हते मात्र ,येथील जनतेच्या माध्यमातून ही कामे मार्गी लागली. यासाठी ग्रामस्थांची एकजूट महत्वाची असून गावाच्या विकासात साथ देणाऱ्या राजकीय पक्षाच्या पाठीमागे राहणे गरजेचे आहे. भारतीय जनता पक्ष हा नेहमी विकासाची घौडदौड करत आला असून विकासकामे तळागाळापर्यंत पोहचवली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात पुन्हा एकदा बळकट करण्यासाठी येणाऱ्या ७ तारखेला शिरशिंगे गावातून 90% पेक्षा जास्त मतदान नारायण राणेंना द्या.भाजपाचे सगळे व्यक्ती शब्द पाळतात मीही शब्द दिल्याप्रमाणे पाळणारा व्यक्ती आहे. त्यामुळे गावाच्या विकासासाठी येणाऱ्या काळात आम्ही तुमच्या सोबत राहू असे श्री परब म्हणाले . यावेळी रवींद्र मडगावकर व पंढरी राऊळ यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान ग्रामस्थ तानाजी धोंड,लक्ष्मण धोंड,अंकुश धोंड,संजय मोरजकर,वसंत धोंड आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Advertisement

Advertisement
Tags :

.