टेक्स्टाईलचे समभाग चमकले
06:28 AM Feb 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 15 टक्के व्यापारशुल्क लावण्याची घोषणा केल्यामुळे शेअरबाजारात सोमवारी टेक्स्टाईल संबंधीत समभागांमध्ये चांगली तेजी पहायला मिळाली. यामध्ये ट्रिडेंट कंपनीचे समभाग 7.6 टक्के, वेलस्पन लिव्हींग यांचे समभाग 4.2टक्के वाढले होते. सोबत अलोक इंडस्ट्रीजचे समभागदेखील 4.1 टक्क्यांची तेजी अनुभवत होते. ट्रम्प यांच्या व्यापार शुल्काच्या नव्या घोषणेमुळे टेक्स्टाईल कंपन्यांना बाजारामध्ये तेजी अनुभवता आली. या वर्षभरामध्ये वेलस्पनचा समभाग 7.7 टक्के इतका वाढला आहे.
Advertisement
Advertisement