टेस्लाची रोबोटॅक्सिस सेवा 22 जूनपासून सुरु ?
तारखेत बदल होणार असल्याचे मस्क यांचे संकेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अलिकडेच अमेरिकेतील ड्रायव्हरलेस रस्त्यांवर टेस्लाची सायबरकॅब धावताना दिसली. इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी टेस्ला 22 जूनपासून त्यांची रोबोटॅक्सिसी सेवा सुरू करू शकते. कंपनीचे सीईओ एलॉन मस्क यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये ही माहिती दिली.
एक्सवरील वापरकर्त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना मस्क म्हणाले, ‘टेस्ला ऑस्टिन, टेक्सास येथे रोबोटॅक्सिसी सेवा सुरू करणार आहे. तथापि, त्याची तारीख अद्याप अंतिम नाही, कारण आम्हाला सुरक्षेची खूप काळजी आहे, यामुळे तारीख बदलू शकते. मस्क यांनी असेही म्हटले की, टेस्लाची पहिली ड्रायव्हरलेस कार 28 जून रोजी कारखान्यातून थेट ग्राहकांच्या घरी स्वत:चालवेल. अमेरिकेत चाचणी दरम्यान दिसणारी रोबोटॅक्सिस मस्क यांनी अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अमेरिकेतील टेक्सासची राजधानी ऑस्टिनच्या रस्त्यांवर टेस्टिंग दरम्यान टेस्लाची ड्रायव्हरलेस रोबोटॅक्सिस दिसली. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.