टेस्लाचे पहिले स्टोअर 15 जुलैला मुंबईत होणार सुरु
मुंबई :
प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांची कंपनी टेस्ला आपले पहिले स्टोअर भारतात 15 जुलैला सुरु करणार आहे. हे स्टोअर मुंबईत सुरु होणार असून भेट देणाऱ्या ग्राहकाला याठिकाणी आल्यावर वेगळा अनुभव प्राप्त होणार आहे, असे कंपनीने म्हटले आहे.
याठिकाणी टेस्लाच्या गाड्या तर विक्री होतीलच पण यासोबत लोकांना टेस्लाचे तंत्रज्ञान व वैशिष्ट्यो जवळून पाहण्याचा अनुभव घेता येणार आहे. कंपनीने अलीकडेच मुंबईतील बांद्राकुर्ला कॉम्प्लेक्समध्ये 4 हजार चौरस फुटाची जागा भाडेतत्वावर घेतली आहे. हे ठिकाण शहरातील अॅपल फ्लॅगशिप स्टोअरच्या जवळ आहे. पहिल्या टप्प्यात कंपनी आपली मॉडेल वाय एसयुव्ही सादर करेल. ही गाडी शांघायमधील फॅक्टरीतून आयात करण्यात आली आहे.
किमत किती?
भारतात या गाडीची किंमत अंदाजे 48 लाखाच्या आसपास असणार आहे. वाय मॉडेलची कार ही जगात सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रीक कार मानली जाते. ऑटो क्षेत्रातील आघाडीवरच्या देशांमध्ये भारत सध्याला तिसऱ्या नंबरवर आहे. तेव्हा ही संधी साधून वाय मॉडेलला भारतात उतरवलं आहे.