टेस्ला करणार सुट्या भागांची भारतातून दुप्पट आयात
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अमेरिकेतील इलेक्ट्रीक कार निर्माती कंपनी टेस्ला यांनी भारतातून सुट्या भागांच्या आयातीत दुप्पट करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. ही माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे.
एका ट्वीटवर त्यांनी ही माहिती दिलीय. त्यात त्यांनी भारतातून ऑटोमोबाईल सुट्या भागांच्या आयातीबाबत टेस्लाचे आभार मानले आहेत. भारतीय ऑटो सुट्या भागांच्या कंपन्यांवर दाखवलेल्या विश्वासाबाबतही टेस्लाचे कौतुक मंत्री गोयल यांनी केले आहे. आगामी काळात सुट्या भागांची आयात टेस्ला दुप्पट करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. फ्रेमंट, कॅलिफोर्निया येथील
मस्क यांची माफी
टेस्लाच्या एका कारखान्याला अलीकडेच मंत्री गोयल यांनी भेट दिली होती. पण टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांची काही भेट होऊ शकली नाही. तथापि याबाबत टेस्लाचे मस्क यांनी याबाबत माफीही मागितली आहे. टेस्ला कंपनी 1.7 अब्ज ते 1.9 अब्ज डॉलर्सच्या किमतीचे सुटे भाग मागवणार असल्याची माहिती आहे. मागच्या वर्षी 1 अब्ज डॉलर्सच्या सुट्या भागांची आयात टेस्लाने केली होती. ती पाहता आता ही आयात दुप्पट होणार आहे.
मंत्री गोयल यांची मायक्रॉन कंपनीला भेट
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी अमेरिकेत दौऱ्यादरम्यान मायक्रॉन टेक्नॉलॉजी कंपनीला भेट दिली. या भेटीदरम्यान कंपनीच्या सीईओसोबंत त्यांनी भारतातील सेमीकंडक्टर क्षेत्राच्या व्यावसायिक संधीबाबत प्रदीर्घ चर्चा केली. केंद्रीय मंत्री गोयल यांनी मायक्रॉन टेक्नॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि अध्यक्ष संजय मेहरोत्रा यांच्यासोबत चर्चा केली. केंद्रीय मंत्री इंडो-पॅसिफीक इकॉनॉमी फ्रेमवर्क फॉर प्रॉस्पॅरीटी या मंत्रीस्तरीय बैठकीत भाग घेण्याआधी त्यांनी सदरच्या कंपनीच्या सॅन फ्रान्सिस्को येथील कार्यालयाला भेट दिली. अमेरिकेतील सेमीकंडक्टर निर्मिती करणाऱ्या सदरच्या कंपनीकडून भारतामध्ये गुजरातमध्ये चीप निर्मितीचा कारखाना सुरू होत आहे. या माध्यमातून येणाऱ्या वर्षांमध्ये 5 हजार ते 15 हजार जणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. भारत सरकारने मायक्रॉनच्या भारतातील योजनेला जूनमध्ये मंजुरी दिली होती.