For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टेस्ला अमेरिकेतील 20 लाख वाहने परत मागविणार

07:00 AM Dec 15, 2023 IST | Tarun Bharat Portal
टेस्ला अमेरिकेतील 20 लाख वाहने परत मागविणार
Advertisement

ऑटोपायलटमधील दोषामुळे कंपनीने घेतला निर्णय

Advertisement

वृत्तसंस्था /वॉशिंग्टन

एलॉन मस्कची इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपनी टेस्ला इंक यांनी तांत्रिक बिघाडामुळे 20 लाख वाहने परत मागविण्याचा निर्णय घेतला आहे. 2015 पासून यूएसमध्ये विकल्या गेलेल्या मॉडेलचा यामध्ये समावेश राहणार असल्याची कंपनीची माहिती आहे. यूएस ऑटो रेग्युलेटरने दिलेल्या माहितीनुसार ऑटोपायलट सिस्टीममधील बिघाड दूर करण्यासाठी ही इलेक्ट्रिक वाहने परत मागवण्यात आली आहेत. सेल्फ-ड्राइव्ह मोड सक्रिय केल्यावर ही प्रणाली ड्रायव्हरला रस्ता आणि रहदारीच्या परिस्थितीबद्दल सतर्क करण्याचे कार्य करते. ऑटोपायलट तंत्रज्ञान वाहनाच्या आसपासच्या वाहतुकीचे मूल्यांकन करण्यासाठी कॅमेरे आणि सेन्सर वापरते. हे वाहन सुरक्षित लेनमध्ये ठेवण्यासाठी रस्त्यावरील लेन मार्किंगचे निरीक्षण करते. तथापि, समीक्षक सुरुवातीपासूनच टेस्लाच्या ऑटोपायलट प्रणालीतील अनेक कमतरता दाखवत आहे.

Advertisement

ऑटोपायलट बिघाडामुळे अनेक अपघात

टेस्लाची ऑटोपायलट प्रणाली वादग्रस्त आहे आणि त्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. यूएस नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशनने अशा अपघातांची चौकशी सुरू केल्यानंतर सुमारे 2 वर्षांनी ऑटोपायलट यंत्रणेत बिघाडाचे कारण पुढे आले आहे.

या वर्षी तिसऱ्यांदा गाड्या परत मागवल्या

कंपनीने यावर्षी तिसऱ्यांदा आपल्या गाड्या परत मागवल्या आहेत. यापूर्वी ऑक्टोबर-2023 मध्ये टेस्ला मॉडेलची 54,676 वाहने परत मागविली होती. याआधी ऑगस्टमध्ये, कंपनीने टेस्लाच्या नवीन मॉडेल 3 आणि मॉडेल वायची 2,80,000 युनिट्स स्टीयरिंग कंट्रोल आणि पॉवर स्टीयरिंगचे नियंत्रण दोषामुळे परत मागवली होती. भारत या अमेरिकन ईव्ही कंपनीला पुढील वर्षापासून देशात इलेक्ट्रिक वाहने आयात करण्यास परवानगी देईल आणि दोन वर्षांच्या कालावधीत एक उत्पादन प्रकल्प उभारेल. जानेवारीत व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये याची अधिकृत घोषणा होण्याची अपेक्षा आहे. टेस्ला गुजरात, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये पायाभूत सुविधा विकसित करू शकते.

Advertisement
Tags :

.