टेस्लाची भारतातील व्यवसायासाठी योजना तयार
चालू महिन्यापासून विक्री सुरु होणार : दोन शहरांमध्ये शोरुम सुरु करणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांची कंपनी टेस्ला आता भारतात आपला व्यवसाय वाढवण्यास सज्ज झाली आहे. यासाठी टेस्लानेही एक योजना आखली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मस्क यांच्या भेटीनंतर टेस्लाचा भारतात प्रवेश झाला आहे. टेस्ला इलेक्ट्रिक कार लवकरच भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.
भारतातील दोन शहरांमध्ये शोरूम्स
मिळालेल्या माहितीनुसार टेस्ला भारतात दोन शोरूम्स उघडणार आहे. ही दोन्ही शोरूम्स देशाची राजधानी मुंबई आणि दिल्ली येथे उघडली जाणार आहेत. दिल्लीतील टेस्लाचे शोरूम इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील एरोसिटी परिसरात होणार आहे. तसेच त्याच वेळी, मुंबईतील (बीकेसी) जवळील विमानतळाजवळ उघडले जाणार आहे. मुंबई आणि दिल्लीतील हे टेस्लाचे शोरूम सुमारे 5,000 चौरस फूट क्षेत्रफळाचे असतील.
एप्रिल 2025 पासून विक्री सुरू होईल
भारतात टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारची विक्री एप्रिल महिन्यापासून सुरू होईल. प्रथम, कंपनी भारतातील बर्लिन प्लांटमधून आयात केलेल्या वाहनांची विक्री करेल. टेस्ला भारतात स्वस्त ईव्ही मॉडेल सादर करणार आहे. भारतात टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारची किंमत 25,000 डॉलर्सपेक्षा कमी म्हणजे सुमारे 21 लाख रुपये असू शकते.
मस्क अलीकडेच पंतप्रधानांना भेटले
टेस्ला आणि भारत यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून अधूनमधून चर्चा होत आहेत, परंतु जास्त आयात शुल्कामुळे टेस्लाने भारतापासून अंतर ठेवले होते. तथापि, भारताने आता अंदाजे रु. 35 लाखपेक्षा जास्त किमतीच्या कारवरील आयात शुल्क 110 टवके वरुन 70 टक्केपर्यंत कमी केले आहे. 13 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी त्यांच्या अमेरिका दौऱ्यात एलॉन मस्क यांना भेटले.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
एलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. त्यांच्याकडे एकूण 34.23 लाख कोटींची मालमत्ता आहे. दुसऱ्या क्रमांकावर मार्क झुकरबर्ग (22.06 लाख कोटी रुपये) आणि तिसऱ्या क्रमांकावर जेफ बेझोस (21 लाख कोटी रुपये) आहेत.