For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टेस्लाचे एसयूव्ही मॉडेल वायएल लाँच

06:25 AM Apr 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
टेस्लाचे एसयूव्ही मॉडेल वायएल लाँच
Advertisement

प्रशस्त अशी तीन-रांगांची आवृत्ती भारतीय बाजारात दाखल

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

एलॉन मस्कची ईव्ही कंपनी टेस्ला इंडियाने भारतीय बाजारपेठेत आपली सर्वात लांब एसयूव्ही मॉडेल वायएल लाँच केली. ही टेस्लाच्या भारतातील पहिल्या कार ‘मॉडेल वाय“ ची अधिक प्रशस्त आणि तीन-रांगांची आवृत्ती आहे. या कारचे सर्वात मोठे वैशिष्ट्या म्हणजे तिची 681 किमीची रेंज आणि 6-सीटर आसनव्यवस्था आहे.

Advertisement

टेस्ला मॉडेल वायएलची एक्स-शोरूम सुरुवातीची किंमत 61.99 लाख आहे. ही स्टँडर्ड मॉडेल वायपेक्षा सुमारे 2.10 लाख रुपये अधिक आहे. कंपनीने या कारसाठी बुकिंग सुरू केले असून, ग्राहकांना लवकरच तिची डिलिव्हरीही दिली जाईल. व्हील्स आणि स्पॉइलर: यात एअरो डिझाइन असलेले नवीन 19-इंची अलॉय व्हील्स आणि मागील बाजूस एक काळा स्पॉइलर मिळतो.

आकार : 150 मिमी लांब व्हीलबेस मॉडेल वायचे मुख्य आकर्षण म्हणजे त्याचा वाढलेला आकार. ही गाडी स्टँडर्ड मॉडेलपेक्षा 179 मिमी लांब आहे. तिचा व्हीलबेस आकार देखील 150 मिलीमीटरने वाढवण्यात आला आहे. गाडीची उंची देखील 44 मिलीमीटरने वाढली आहे.

रेंज: कंपनीचा दावा आहे की ही कार पूर्ण चार्जवर 681 किमी (डब्ल्यूएलटीपी प्रमाणित) पर्यंत धावू शकते.

वेग: तिचा कमाल वेग 201 किमी/तास आहे.

सुरक्षा वैशिष्ट्यो: एडीएएस आणि फुल सेल्फ-ड्रायव्हिंगचे पर्याय

यात 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ईएससी) आणि पार्किंग सेन्सर्स मिळतात.

Advertisement
Tags :

.