For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टेस्लाने केली पहिल्या ईव्हीची भारतात डिलिव्हरी

06:16 AM Sep 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
टेस्लाने केली पहिल्या ईव्हीची भारतात  डिलिव्हरी
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

दिग्गज उद्योगपती एलॉन मस्क यांच्या टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी  मुंबईमध्ये सुरू झाली आहे. जुलै महिन्यामध्ये बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये कंपनीचे पहिले शोरूम उघडण्यात आले होते. या अंतर्गत पहिल्या इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी नुकतीच कंपनीने केली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे पहिले ग्राहक ठरले आहेत. त्यांनी टेस्लाची इलेक्ट्रिक कार जुलैमध्ये बुक केली होती. त्यांनी सदरची इलेक्ट्रिक कार आपल्या मुलाला भेट दिली आहे. यायोगे लोकांनी जास्तीत जास्त इलेक्ट्रीक कार्स वापरत पर्यावरणाला हातभार लावण्याचे त्यांनी आवाहन केले.

Advertisement
Advertisement
Tags :

.