For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क ‘पोहोच गये’ चीन

06:17 AM Apr 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क ‘पोहोच गये’ चीन
Advertisement

सेल्फ ड्राइव्हिंग सॉफ्टवेअरबाबत अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा

Advertisement

वृत्तसंस्था/ बीजिंग

जागतिक स्तरावरील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन निर्माती कंपनी टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क एकाएकी चीन दौऱ्यावर पोहोचले आहेत. या भेटीत सेल्फ ड्राइव्हिंग कारच्या प्रकल्पाबाबत मंजुरीसाठी तेथील अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. मागच्या आठवड्यामध्ये ते भारत दौऱ्यावर येणार होते.

Advertisement

टेस्लाला चीनकडून एका संदर्भात महत्त्वपूर्ण मंजुरी मिळाली असल्याचे बोलले जात आहे. या नव्या चीन सोबतच्या वार्तालापानंतर चीनमधील कारविक्रीमधील घसरण थांबवण्यासाठी टेस्लाला मदतच होणार असल्याचे सांगितले जात आहे. रॉयटर यांच्या अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

चीनमधील दिग्गज इंटरनेट सर्च कंपनी बायडू यांनी टेस्लांसोबत एक करार केला असल्याचे समजते. याअंतर्गत टेस्लाला मॅपिंग लायसन्स मिळू शकणार आहे. चीनमध्ये फुल सेल्फ ड्रायव्हिंग टेक्नॉलॉजी सादरीकरणाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असणार आहे. टेस्लासाठी चीन ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. वरील संदर्भातील मुद्यांवर सहमती झाल्यानंतर टेस्लाचा ऑटोमॅटिक कार चीनमध्ये लॉन्च करण्याचा रस्ता मोकळा झाला आहे. मस्क यांनी चीनचे पंतप्रधान ली क्युयांग यांची भेट घेतली.

रॉयटर्सच्या मते मस्क चीनमध्ये टेस्लाच्या सेल्फ ड्राइव्हिंग गाड्यांसाठी आवश्यक एफएसडी सॉफ्टवेअरकरीता मंजुरी मिळवण्यासाठी चीनमधील दिग्गज अधिकाऱ्यांना भेटले. याशिवाय चीनमध्ये टेस्लाच्या गाड्यांची एकत्रित होणारी माहिती अन्य देशांना पाठवून आपल्या गाड्या अधिक चांगल्या बनवण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत.

सॉफ्टवेअर वापराकरीता परवानगी

चीनमध्ये 2021 पासून टेस्लाच्या गाड्या वापरात असून त्या गाड्या एकत्रित माहिती गोळा करतात, ती माहिती देशातच सुरक्षित राहते आणि अमेरिकेत पुन्हा ही माहिती पाठवली जात नाही. अमेरिकेतील इलेक्ट्रीक गाडी बनवणारी कंपनी टेस्लाने चार वर्षापूर्वीच सेल्फ ड्राइव्हिंग कार्सकरीता एफएसडी हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. पण असे असले तरी चीनमध्ये लोकांची मागणी असतानाही आतापर्यंत याचे सादरीकरण करण्यात आलेले नाही.

Advertisement
Tags :

.