For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दहशतवादी यासीन मलिक पत्नीला देणार घटस्फोट

07:00 AM Sep 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
दहशतवादी यासीन मलिक पत्नीला देणार घटस्फोट
Advertisement

नवी दिल्ली : तिहार तुरुंगात कैद दहशतवादी यासिन मलिकने स्वत:च्या पत्नीपासून घटस्फोट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या यासिनने तुरुंगातून स्वत:च्या परिवारासाठी एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्याने पत्नी मुशाल मलिकला घटस्फोट देण्याच्या निर्णयाचा उल्लेख केला आहे. जम्मूच्या विशेष न्यायालयात दाखल 25 पानांच्या एका प्रतिज्ञापक्षात यासिनने स्वत:च्या पत्नीसोबत आई, 13 वर्षीय मुलगी सुल्तानासाठी देखील संदेश पाठविला आहे.  मागील 8 वर्षांपासून पत्नी मुशालशी फोनवरून बोलू शकलेलो नाही.

Advertisement

तुरुंगात असताना कधीच परिवाराशी संपर्काची अनुमती मिळू शकलेली नाही. घटस्फोटाचा निर्णय मी अत्यंत दु:खात घेतला आहे. मुशालने पूर्ण आयुष्य या स्थितीचा भार झेलून जगावे अशी माझी इच्छ नाही. मुशालने सन्मान अन् अपेक्षेसह स्वत:च्या जीवनाचा नवा अध्याय सुरू करावा असे यासिनने पत्रात म्हटले आहे. प्रत्यक्षात यासिन मलिकला मृत्युदंड ठोठावण्यात येण्याची भीती आहे. माझ्यासमोर मृत्युदंड किंवा तुरुंगात दीर्घकाळापर्यंत राहण्याची शक्यता आहे. अशास्थितीत मी पत्नीला या नात्यातून मुक्त करू इच्छितो, जेणेकरून तिला अनिश्चितता आणि चिंतायुक्त जीवनाला सामोरे जावे लागू नये असे यासिनने म्हटले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.