For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उरीमध्ये दहशतवाद्यांचा कट उधळला

06:36 AM Apr 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
उरीमध्ये दहशतवाद्यांचा कट उधळला
Advertisement

घुसखोराला कंठस्नान : लोकसभा निवडणुकीपूर्वी नियंत्रण रेषेवर मोठी कारवाई

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

भारतीय लष्कराने शुक्रवार दि. 5 एप्रिल रोजी पहाटे उरीमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. एलओसीच्या ऊस्तम पोस्ट परिसरात घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावत लष्कराने एका दहशतवाद्याला ठार केले आहे. चकमकीनंतर परिसरात घेराबंदी घालून शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली आहे. चकमकीनंतर लष्कराने उरी सेक्टरमधील ऊस्तम पोस्ट येथे असलेल्या सबुरा नाल्यातून दोन एके सीरीज रायफल, चार ग्रेनेड, मोबाईल फोन आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त केला आहे.

Advertisement

भारतीय लष्कराच्या जवानांनी केलेल्या प्रभावी गोळीबारामुळे भारतीय हद्दीत घुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांच्या एका गटाला माघारी फिरावे लागले. यावेळी नियंत्रण रेषेवर दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये गोळीबार झाला. गोळीबारानंतर अतिरिक्त फौजा घटनास्थळी पाठवण्यात आल्याचे लष्करी सूत्रांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीदरम्यान घातपात घडवण्यासाठी पाकिस्तानी दहशतवादी सक्रिय झाले असून त्यांना रोखण्यासाठी भारतीय सुरक्षा दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. शुक्रवारी लष्कराने जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. यादरम्यान लष्कराने एका दहशतवाद्यालाही ठार केले. 5 मार्चच्या पहाटे या भागात दहशतवादी कारवाया सुरू असल्याचे आढळून आले. गुप्त माहितीनंतर, सुरक्षा दलांनी घुसखोरांना आव्हान दिल्यानंतर चकमक झाली. घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडल्यानंतर भारतीय लष्कराने घटनास्थळी अतिरिक्त फौजफाटा पाठवला आहे.

Advertisement
Tags :

.