For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टीटीपी’च्या संपर्कातील दहशतवाद्याला अटक

06:41 AM Aug 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
टीटीपी’च्या संपर्कातील दहशतवाद्याला अटक
Advertisement

बेंगळूर पोलिसांची कारवाई, कसून चौकशी सुरू

Advertisement

त. भा. प्रतिनिधी / बेंगळूर

तेहरिक-ए-तालिबान-पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या 25 वर्षीय युवकाला बेंगळूर पोलिसांनी अटक केली आहे. असाफुल मलिक असे त्याचे नाव आहे. तो पश्चिम बंगालच्या चोवीस परगणा जिल्ह्यातील नौपुरा येथील रहिवासी आहे. पाकिस्तानातील मशिदी आणि नागरिकांवर केलेल्या कथित हल्ल्याचा प्रतिकार म्हणून त्याने पाकिस्तानी सैन्यावर हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे.

Advertisement

बेंगळूर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेतील असाफुल मलिक याची फेसबुकद्वारे अफगाणिस्तानातील इम्रान अहिंदर याच्याशी ओळख झाली होती. त्याने पाकिस्तानात बंदी असलेल्या टीटीपी या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला. त्याने इम्रानच्या मदतीने पासपोर्टही मिळविला होता. त्याने विदेशातून पाकिस्तानात जाण्यासाठी व्हिसासाठी अर्ज केला होता. पाकिस्तानी सैन्याने तेथील मशिदींवर आणि नागरिकांवर केलेल्या कथित हल्याचा सूड उगवण्यासाठी तेथील सैन्यावर हल्ल्याचा कट रचला होता.

11 ऑगस्ट रोजी बोम्मसंद्र औद्योगिक वसाहत परिसरात त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या जवळून मोबाईल आणि इतर कागदपत्रे जप्त केली. त्याच्या मोबाईलमध्ये पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य करण्याचा कटाशी संबंधित महत्त्वाच्या ध्वनिफिती आढळल्या आहेत. बेंगळूर पोलिसांनी त्याची सखोल चौकशी चालविली आहे.

Advertisement
Tags :

.