महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दहशतवादी जगतारची सर्वोच्च न्यायालयात धाव

06:43 AM Sep 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दिल्लीऐवजी पंजाबच्या तुरुंगात हलविण्याची मागणी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दहशतवादी जगतार सिंह हवाराने स्वत:ला दिल्लीमधून पंजाबच्या कुठल्याही तुरुंगात हलविण्याची मागणी केली आहे. याकरता त्याने सर्वोच्च न्यायालयात एक अर्ज केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हवाराच्या अर्जाप्रकरणी दिल्ली, पंजाब आणि केंद्र सरकारला भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. हवाराला 1995 मध्ये पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री बेअंत सिंह यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हवारा हा सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात कैद आहे.

बब्बर खालसाशी संबंधित दहशतवादी हवारा हा 2004 मध्ये चंदीगडच्या बुडैल तुरुंगात भुयार खणून स्वत:च्या दोन सहकाऱ्यांसोबत पसार झाला होता. परंतु 2005 मध्ये त्याला दिल्लीत पुन्हा अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो तिहार तुरुंगात आहे.

हवाराने स्वत:च्या सहकाऱ्यांसोबत मिण्tन 1995 मध्ये पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री बेअंत सिंह यांची बॉम्बस्फोट घडवून आणत हत्या केली होती. याप्रकरणी हवारासोबत परमजीत सिंह भ्यौरा, बलवंत सिंह राजोआणा आणि जगतार सिंह तारा तसेच अन्य काही जणांना आरोपी करण्यात आले होते. यातील बहुतांश जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती

हवाराला मागील वर्षी देशद्रोहाच्या एका प्रकरणात जिल्हा न्यायालयाने निर्दोष ठरविले होते. हवारा आणि त्याचे सहकारी देशात दहशत पसरविण्याचे काम करत होते असा पोलिसांचा आरोप होता. या दहशतवाद्यांकडून पिस्तुल आणि 450 ग्रॅम आरडीएक्स हस्तगत करण्यात आले होते. याप्रकरणी परमजीत सिंह उर्फ सुखा आणि कमलजीत सिंह उर्फ मान या दहशतवाद्यांना न्यायालयाने दोषी ठरविले होते. तर हवाराला साक्षीदाराने ओळखण्यास नकार दिल्याने त्याला याप्रकरणी निर्दोष्घ् ठरविण्यात आले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article