For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बहावलपूरमध्ये दहशतवादी केंद्र पुन्हा सक्रीय

06:32 AM Jul 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
बहावलपूरमध्ये दहशतवादी केंद्र पुन्हा सक्रीय
Advertisement

जैश-ए-मोहम्मदचा ‘कॅडर’ परतला : कुख्यात स्वीमिंग पूलही खुला

Advertisement

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

भारतीय वायुदलाने 6 आणि 7 मेदरम्यान ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी अ•dयांना नष्ट केले होते. भारताने पाकव्याप्त काश्मीरसोबत बहावलपूर शहरातील जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयालाही लक्ष्य केले होते. ऑपरेशन सिंदूरमुळे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेला मोठे नुकसान पोहोचले होते. परंतु पाकिस्तान सरकार आणि सैन्याच्या मदतीने जैश-ए-मोहम्मद पुन्हा स्वत:चे हे ‘केंद्र’ उभे करत आहे. बहावलपूर येथील मदरसा, दहशतवादी प्रशिक्षण केंद्र आणि दहशतवाद्यांकडून वापरण्यात येणारा कुख्यात स्वीमिंग पूल पुन्हा खुला झाला आहे.

Advertisement

भारतीय वायुदलाच्या हवाई हल्ल्याला तोंड दिलेल्या बहावलपूरच्या सुभान अल्लाह मदरसा परिसरातील स्वीमिंग पूल पुन्हा खुला करण्यात आला आहे. मदरशात देखील नियमित हालचाली सुरू झाल्या आहेत. मदरशामधील हा स्वीमिंग पूल अत्यंत बदनाम राहिला आहे. जैशचे दहशतवादी या स्वीमिंग पूलचा वापर दहशतवादी कारवायांपूर्वी करत राहिले आहेत.

सोशल मीडियावर घोषणा

बहावलपूर मदरशातील जवळपास 600 विद्यार्थ्यांनी स्वत:च्या नियमित हालचाली सुरू केल्याचे जैश-ए-मोहम्मदने सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले आहे. स्वीमिंग पूल पुन्हा खोलणे, छोटी बाब वाटू शकते, परंतु उन्हाळ्यात बहावलपूरच्या गरीब मुलांसाठी हे मोठे आकर्षण ठरते. याचा वापर जैश-ए-मोहम्मदकडून नव्या दहशतवाद्यांची भरती करण्यासाठी केला जात असतो असे भारतीय अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. 2019 मध्ये पुलवाम येथे आत्मघाती हल्ला घडवून आणणारे उमर फारुक, तल्हा रशीद अल्वी, इस्माइल अल्वी आणि रशीद बिल्लाने काश्मीरमध्ये जाण्यापूर्वी या स्वीमिंग पूलमध्ये उतरत स्वत:ची छायाचित्रे काढून घेतली होती.

पहलगाम हल्ल्यानंतर कारवाई

22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या पंजाब अन् पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अ•dयांना नष्ट केले होते. बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयावरही क्षेपणास्त्र डागण्यात आले होते. यानंतर सुभान अल्लाह मशिद अन् मदरशाला बंद करण्यात आले होते. परंतु आता हा परिसर पुन्हा खुला करण्यात आला आहे.

बहावलपूर येथील हा परिसर 18 एकरमध्ये फैलावलेला आहे. या परिसरात 12 हजार विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहं, क्रीडा सुविधा, स्वीमिंग पूल अन् इतर सुविधा आहेत. पाकिस्तान सरकार याला केवळ एक मदरसा अन् हॉस्टेल ठरविते. परंतु या परिसरात जैश-ए-मोहम्मदकडून दहशतवादी प्रशिक्षण केंद्र चालविण्यात येते, जेथे अनेक दहशतवाद्यांची निवासस्थानं देखील आहेत.

Advertisement
Tags :

.