For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

24-48 तासांत बगदादमध्ये दहशतवादी हल्ला

06:36 AM Apr 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
24 48 तासांत बगदादमध्ये दहशतवादी हल्ला
Advertisement

शहरातून त्वरित बाहेर पडा : अमेरिकेचा दूतावास

Advertisement

इराकची राजधानी बगदादमधील अमेरिकेच्या दूतावासाने गुरुवारी अत्यंत गंभीर सुरक्षा इशारा जारी केला आहे. इराणचे समर्थनप्राप्त मिलिशिया गट एक किंवा दोन दिवसांमध्ये मध्य बगदादला लक्ष्य करू शकतात अशी भीती दूतावासाने व्यक्त  केली आहे.

हा संभाव्य गंभीर धोका पाहता दूतावासाने इराकमधील सर्व अमेरिकेच्या नागरिकांसाठी दिशानिर्देश जारी केले आहेत. स्वत:ची सुरक्षा सुनिश्चित करा आणि कुठल्याही विलंबाशिवाय त्वरित इराकमधून बाहेर पडा असा आग्रह दूतावासाने अमेरिकेच्या नागरिकांना केला आहे.

Advertisement

 

दूतावासाच्या वक्तव्यात विशेष स्वरुपात ‘मध्य बगदाद’चा उल्लेख करण्यात आला आहे. हा भाग सुरक्षेसाठी अत्यंत संवेदनशील मानला जातो, कारण येथे अनेक विदेशी दूतावास आणि महत्त्वपूर्ण शासकीय इमारती आहेत.

मध्यपूर्वेत भू-राजकीय तणाव शिगेला पोहोचला असताना हा इशारा देण्यात आला आहे. अमेरिका इराकमधील स्वत:चे नागरिक, राजनयिक आणि सैन्यतळांच्या  सुरक्षेवरून पूर्णपणे सतर्क आहे.

अमेरिकन पत्रकाराचे अपहरण

दोन दिवसांपूर्वीच बगदादमध्ये अमेरिकन पत्रकाराचे अपहरण करण्यात आले होते. इराकच्या सुरक्षा दलांनी या महिला पत्रकाराचा शोध घेण्यासाठी अभियान हाती घेतले आहे. याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली असून अपहरणासाठी वापरण्यात आलेल्या वाहनांपैकी एक जप्त करण्यात आल्याचे इराकच्या गृह मंत्रालयाने सांगितले आहे.

Advertisement
Tags :

.