For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फारुख अब्दुल्लांमुळेच काश्मीरमध्ये दहशतवाद!

06:21 AM Sep 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
फारुख अब्दुल्लांमुळेच काश्मीरमध्ये दहशतवाद
Advertisement

गृहमंत्री अमित शहांचा हल्लाबोल : मोदी गोळीला गोळीने उत्तर देत असल्याचाही दावा

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर होते. मेंढर येथील सभेत बोलताना त्यांनी फारुख अब्दुल्ला यांच्यावर टीकेची तोफ डागली. 90 च्या दशकात फाऊख अब्दुल्लांच्या आशीर्वादाने दहशतवाद आला. त्यावेळी इथे खूप गोळीबार व्हायचा कारण इथल्या धन्यांना पाकिस्तानची भीती वाटत होती, असा टोमणा मारत सध्याचे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील सरकार गोळीला गोळीनेच उत्तर देत असल्याचा दावा त्यांनी केला.

Advertisement

आता पाकिस्तान नरेंद्र मोदींना घाबरत आहे. गोळीबार करण्याचे धाडस पाकिस्तानमध्ये नाही. गोळीबार झाला तर मोदी गोळ्यांनी प्रत्युत्तर देतात. ही निवडणूक जम्मू-काश्मीरमधील तीन कुटुंबांची राजवट संपवणारी आहे. या तिन्ही कुटुंबांनी 1990 ते 2014 या काळात संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये दहशत पसरवली होती. यादरम्यान 40 हजार तऊण मारले गेले, असे शहा म्हणाले. गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी दुपारी मेंढार येथील सभेला संबोधित केले. त्यानंतर थानामंडी, राजौरी, पुंछ आणि अखनूरमधील कार्यकर्त्यांनाही त्यांनी संबोधित पेले. शहा यांचा पाच दिवसांतील हा दुसरा दौरा आहे. यापूर्वी 16 सप्टेंबर रोजी त्यांनी पद्दार नागसेनी, किश्तवाड आणि रामबन येथे जाहीर सभा घेतल्या होत्या.

1947 पासून पाकिस्तानविऊद्ध लढलेल्या प्रत्येक युद्धात जम्मू-काश्मीरच्या सैनिकांनी भारताचे रक्षण केले आहे. 1990 च्या दशकात दहशतवाद्यांची घुसखोरी सुरू असतानाही पहाडी, गुर्जर आणि बकरवाल बंधूंनी सीमेवर गोळ्यांचा धैर्याने सामना केला, असे शहा म्हणाले. तसेच भाजप सत्तेत आल्यास मिळणाऱ्या लाभांविषयही त्यांनी भाष्य केले. भाजपचे सरकार निवडून दिल्यास आम्ही प्रत्येक घरातील एका महिलेला वार्षिक 18,000 ऊपयांचा धनादेश देऊ. हा धनादेश थेट बँक खात्यात जाईल. तसेच ईद आणि मोहरमच्या निमित्ताने 2 गॅस सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. शेतकऱ्यांना मिळणारे 6 हजार ऊपये 10 हजार ऊपयांमध्ये रुपांतरित केले जातील. शेतीचे वीज बिल 50 टक्के कमी करू. 500 युनिटपर्यंत मोफत वीजही दिली जाईल, असेही शहा यांनी उपस्थितांना सांगितले.

भाजप नेतेच पाकिस्तानवादी : अब्दुल्ला

अमित शहांच्या शाब्दिक हल्ल्याला फाऊख अब्दुल्ला यांनीही चोख प्रत्युत्तर दिले आहे. जेव्हा जेव्हा काहीही समोर येते तेव्हा भाजपचे नेते पाकिस्तानचे नाव घेत आम्ही पाकिस्तानी असल्याचे सांगत सुटतात. फाऊख अब्दुल्ला आणि राहुल गांधी यांची युती पाकिस्तानच्या बाजूने असल्याचे या लोकांचे म्हणणे आहे. आमचा पाकिस्तानशी आमचा काय संबंध? अशी विचारणा करत भाजपचे नेतेच  पाकिस्तानवादी असल्याचा प्रतिवार अब्दुल्ला यांनी केला.

Advertisement
Tags :

.