For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केळकर बागेत भुरट्या चोरांची दहशत

09:44 AM Apr 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
केळकर बागेत भुरट्या चोरांची दहशत
Advertisement

घरासमोरील वाहनांतील पेट्रोल चोरीचे प्रकार

Advertisement

बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरात चोऱ्या, घरफोड्यांपाठोपाठ घरासमोर उभ्या करण्यात आलेल्या वाहनातील पेट्रोल चोरण्याचे प्रकार वाढले आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागातील केळकर बाग परिसरात शनिवारी रात्री पेट्रोल चोरीचा प्रकार घडला असून चोरट्यांची छबी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. गेल्या एक-दोन महिन्यांपासून अधूनमधून पेट्रोल चोरीचे प्रकार सुरूच आहेत. शनिवार दि. 20 एप्रिल रोजी रात्री उशिरा दुचाकीवरून आलेल्या चौघा जणांनी घरासमोर उभ्या करण्यात आलेल्या वाहनातून पेट्रोल काढण्याचा प्रयत्न केला आहे. हातात बाटल्या घेऊन हे तरुण दोन दुचाकीवरून केळकर बाग परिसरात आले होते. हातात रिकामी बाटली घेतलेला एक तरुण पेट्रोल चोरीसाठी जातो. त्यावेळी जवळच मोटरसायकल उभी करून उर्वरित तिघेजण थांबलेले असतात. घरमालकांना जाग येऊन त्यांनी चोर चोर अशी आरडाओरड करताच चोरट्यांनी तेथून पलायन केले आहे. शहरातील मध्यवर्ती भागात सुरू झालेल्या पेट्रोल चोरीच्या प्रकारामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. केळकर बाग परिसरातील बोळात रात्री उशिरापर्यंत बाहेरून आलेले काही उपद्व्यापी तरुण ठाण मांडून बसून असतात. या मार्गावरून ये-जा करणाऱ्यांना धमकावण्याचे प्रकारही घडू लागले आहेत. रस्त्याशेजारी उभ्या करण्यात आलेल्या वाहनांबरोबरच घराच्या कंपाऊंडमधील वाहनांतीलही पेट्रोल काढण्यात येत आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी या भुरट्या चोरांच्या मुसक्या आवळण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.