For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जम्मूत शौर्यचक्र विजेत्याच्या निवासावर दहशतवादी हल्ला

06:47 AM Jul 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
जम्मूत शौर्यचक्र विजेत्याच्या निवासावर दहशतवादी हल्ला
Advertisement

चकमकीत एक दहशतवादी ठार : जवानासह एक नागरिक जखमी

Advertisement

वृत्तसंस्था/ जम्मू

जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी सोमवारी पहाटे तीन वाजता राजौरी जिह्यातील गुंडा खवास गावात शौर्यचक्र विजेते परशोत्तम कुमार यांच्या घराजवळ हल्ला केला. यानंतर झालेल्या चकमकीत लष्कराचा एक जवान आणि एक नागरिक जखमी झाला आहे. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले असून परिसरात कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

जम्मूच्या राजौरी येथील घोंडा भागात सोमवार,पहाटे 3.10 वाजता शौर्यचक्र विजेत्याच्या निवासावर हल्ला झाला. या घटनेची माहिती मिळताच 63 आरआर लष्करी पथकाच्या तुकडीने प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्याला ठार केले. दहशतवाद्याची ओळख पटलेली नाही. शौर्यचक्र विजेत्याचे नाव परशोत्तम कुमार असे आहे. गेल्या महिन्यात दोन दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर त्यांना हा सन्मान मिळाला होता. परशोत्तम कुमार हे गावचे संरक्षण रक्षक (व्हीडीसी) म्हणून कार्यरत आहेत. या हल्ल्यात ते बचावले असले तरी एक जवान आणि परशोत्तम कुमार यांचे काका जखमी झाले आहेत. दोघांनाही ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दिवसभर शोधमोहीम

दहशतवादी हल्ल्याच्या या घटनेनंतर अधिक सुरक्षादल घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. जंगलभागात दहशतवादी लपून बसल्याची शक्मयता आहे. परशोत्तम कुमार यांच्या निवासाबरोबरच लष्कराच्या तळावरही दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. घटनास्थळी अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत. लष्कर आणि पोलीस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत.

कुरापतींमध्ये वाढ

गेल्या काही महिन्यांपासून जम्मू भागात दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. यावषी 9 जूनपासून जम्मू भागात सहा दहशतवादी हल्ले झाले आहेत. यामध्ये 12 सुरक्षा जवान हुतात्मा झाले आहेत. हे हल्ले पूंछ, राजौरी, दोडा आणि कठुआ जिह्यात झाले. 16 जुलै रोजी दोडा आणि 8 जुलै रोजी कठुआ येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 10 जवान हुतात्मा झाले होते.

दहशतवादी सक्रिय

जम्मू प्रदेशातील डोंगराळ जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांच्या गटाचा सामना करण्यासाठी लष्कराने सुमारे 4,000 अतिरिक्त सैनिक तैनात केले आहेत. दहशतवाद संपवण्यासाठी पॅरा कमांडो आणि पर्वतीय युद्धात प्रशिक्षित सैनिक या जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आले आहेत. शांततापूर्ण जम्मू भागात दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. दहशतवाद्यांच्या डावपेचांना तोंड देण्यासाठी सुरक्षा दलांनी सुधारित रणनीती अवलंबली आहे.

Advertisement
Tags :

.