For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Shirole Accident | शिरोळ-अर्जुनवाड मार्गावर टेम्पो-कारचा भीषण अपघात; दोन मुली जखमी!

12:28 PM May 03, 2026 IST | NEETA POTDAR
shirole accident   शिरोळ अर्जुनवाड मार्गावर टेम्पो कारचा भीषण अपघात  दोन मुली जखमी
Advertisement

                                  शिरोळमध्ये माती वाहतूक करणाऱ्या डंपरचा थरार

Advertisement

शिरोळ : शिरोळ-अर्जुनवाड राज्यमार्गावर चारचाकी वाहन आणि टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात टेम्पो पलटी झाला आहे. या अपघातात चारचाकीमधील दोन मुली जखमी झाल्या असून, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांचे सत्र सुरूच असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरोळ-अर्जुनवाड मार्गावर माती वाहतूक करणाऱ्या डंपरचा वेग प्रचंड होता. या भरधाव डंपरमुळे वाहनचालकाचे नियंत्रण सुटले आणि चारचाकी व टेम्पोची धडक झाली. धडक इतकी जोरात होती की टेम्पो रस्त्याकडेला पलटी झाला. या अपघातात कारमधील दोन मुलींना दुखापत झाली असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावरील काम रखडलेले आहे. अपूर्ण रस्ता आणि त्यातच मोठ्या प्रमाणात होणारी मातीची वाहतूक यामुळे हा मार्ग वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. भरधाव डंपरवर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे जीव धोक्यात आले आहेत. 

Advertisement

आंदोलनाचा इशारा मिरज - सलगर या राज्य मार्गाचे काम  अर्धवट करण्यात आले आहे. काम पूर्ण व्हावे यासाठी आंदोलन अंकुश सामाजिक संघटनेकडून वारंवार निवेदन देऊनही काम पूर्ण झाले नाही.  हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण झाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलन अंकुशच्या वतीने देण्यात आला आहे परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.

Advertisement
Tags :

.