Miraj accident | मिरजेत कृष्णाघाट रस्त्यावर भीषण थरार; दोन दुचाकींची जोरदार धडक, दुर्गानगरचा तरुण जागीच ठार!
मिरजमध्ये भीषण दुचाकी अपघात; ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू
मिरज : शहरातील कृष्णाघाट रस्त्यावर भरधाव दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात प्रशांत करवीर पाटील (वय ३५, रा. दुर्गानगर, मिरज) या तरुणाचा मृत्यू झाला. तर दुचाकीवर पाठीमागे बसलेले राकेश प्रमोद होळकर (वय ४१, रा. कमानवेस) प्रशांत यांचे बहिण व भाचा असे तिघेजण जखमी झाले. याबाबत महात्मा गांधी चौकी पोलिसात गुन्हा नोंद आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मयत प्रशांत पाटील हे होंडा दुचाकी (एमएच-१०-एई-२०६४) वरुन बहिण व भाच्याला घेऊन कृष्णाघाट रस्त्याने जात होते. या हॉटेलसमोर आल्यानंतर त्यांनी
रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकार दुचाकी चालविली. समोरुन जाणाऱ्या मोपेड दुचाकी (एमएच-१०-ईटी-४८१८) ला धडक दिली.
या अपघातात गंभीर जखमी होऊन दुचाकीस्वार प्रशांत पाटील यांचा मृत्यू झाला. तर दुचाकीवर पाठीमागे बसलेले अन्य दोघे जखमी झाले. तसेच दुचाकीचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.सदर अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. महात्मा गांधी चौकी पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.
दुचाकीस्वाराच्या चुकीमुळे अपघात होऊन स्वतः दुचाकीस्वार मरण पावल्याचे तपासातून स्पष्ट झाले असून, गांधी चौकी पोलिसांनी अपघाताबाबत नोंद केली आहे. पालीस अधिक तपास करीत आहेत