For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Hatkanangale accident | हातकणंगले-तारदाळ मार्गावर भीषण थरार; समोरून येणारा काळ दिसलाच नाही, एकाचा जागीच मृत्यू!

10:54 AM Jun 02, 2026 IST | NEETA POTDAR
hatkanangale accident   हातकणंगले तारदाळ मार्गावर भीषण थरार  समोरून येणारा काळ दिसलाच नाही  एकाचा जागीच मृत्यू
Advertisement

                                     हातकणंगलेत भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Advertisement

हातकणंगले - लेक, कुळचे टील, रविंद्र देंगे, प्यांचीतारदाळ-हातकणंगले मार्गावर दोन दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. सलीम गुलाब कोतवाल (रा. शिरोली, ता. हातकणंगले) असे मृताचे नाव आहे. हा अपघात हातकणंगले शहराच्या हद्दीत घडला आहे.

हातकणंगले तारदाळ मार्गावर दोन दुचाकी समोरून येणाऱ्यावाहनांची गती न समजल्याने परस्परांना जोरदार धडकल्या. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीस्वार सलीम कोतवालचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केले.

Advertisement

दरम्यान, दुसऱ्या दुचाकीवरील दोन अल्पवयीन कामगार मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून हे दोन्ही मुले मूळची बिहार राज्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

Advertisement
Tags :

.