For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News | साताऱ्यात मध्यरात्री भीषण थरार! काँग्रेस कमिटीसमोर अचानक लागली आग; 'त्या' एका हुशारीमुळे टळला मोठा अनर्थ!

05:06 PM May 29, 2026 IST | NEETA POTDAR
satara news   साताऱ्यात मध्यरात्री भीषण थरार  काँग्रेस कमिटीसमोर अचानक लागली आग   त्या  एका हुशारीमुळे टळला मोठा अनर्थ
Advertisement

                                  साताऱ्यात मध्यरात्री भीषण आग;

Advertisement

सातारा -सातारा शहरातील काँग्रेस कमिटीसमोर गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागून पाच हातगाडे जळून खाक झाले. या घटनेत वडापाव, चायनिज तसेच कटलरी व्यवसाय करणाऱ्या हातगाड्यांचे मोठे नुकसान झाले.

आगीची माहिती मिळताच तत्काळ सातारा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने चायनिझ गाड्यावरील सिलिंडर हा बाजूला इतरत्र नेल्याने अनर्थ टळला असून याची नोंद
सातारा: मध्यरात्री लागलेल्या आगीत पाच टपऱ्या खाक झाल्या. पोलिसात झाली नव्हती.

Advertisement

गुरुवारी मध्मरात्री टपऱ्यांना अचानक आग लागली. या आगीत विलास सूर्यवंशी यांचा वडापाव गाडा, संदीप माने यांचा चायनिज गाडा तसेच अभिषेक जाधव, लक्ष्मण शिंदे आणि इम्रान इनामदार यांच्या कटलरी
दुकानांच्या हातगाड्या भस्मसात झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत हातगाड्यांचे मोठे नुकसान झाले होते. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

Advertisement
Tags :

.