Solapur News : टेंभुर्णी-बार्शी रोडवर भीषण अपघात ; बस-कार धडकेत तिघांचा मृत्यू
टेंभुर्णी जवळ बसच्या धडकेत कारचा चेंदामेंदा
टेंभुर्णी : ओव्हरटेक करणाऱ्या बसने समोरील कारला धडक दिल्याने कारमधील तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. अपघात टेंभुर्णी-बार्शी रोडवर टेंभुर्णी जवळील तांबवे गावच्या हद्दीत बुधवारी दुपारी २.४५ वा. सुमारास घडला.
बाळासाहेब महादेव काशीद (वय ५७), सुनीता बाळासाहेब काशीद (वय ५०, दोघे रा. बुवासहेब नगर, कोळकी, ता. फलटण, जि. सातारा), शारदा संभाजी राऊत (वय ६५, तावशी ता. इंदापूर जि. पुणे) अशी मृतांची नावे आहेत.
मुकाबाई कल्याण राऊत (वय ७०, रा. तावशी, ता. इंदापूर, जि. पुणे) असे जखमी महिलेचे नाव आहे. उपकार उर्फ बाळासाहेब काशीद हे त्यांची पत्नी सुनीता, सासू शारदा राऊत व चुलत सासू मुक्ताबाई राऊत असे चौघे मिळून काशीद यांच्या कारमधून (एमएच ११ सीजी ९०६६) मधन माढा येथे लग्नाला गेले होते. लग्न उरकून टेंभुर्णीकडे येताना उपकार यांच्या कारला समोरून आलेल्या रोहा-पुणे-लातूर बसने (एम.एच १४ एम. एच ०१९८) समोरील अन्नात वाहनास ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बस फलटणकडे निघालेल्या कारला धडक दिली.
कारमधील बाळासाहेब काशीद, सुनीता काशीद, शारदा राऊत, मुक्ताई राऊत गंभीर जखमी झाले. त्यांना टेभर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शखल केले असता तिघांना मृत घोषित केले. अपघातात कारचे दीड लाखाचे तर बसचे पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे. अपघाताची फिर्याद अनिल जगन्नाथ यादव (बय ५०, रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर, जि. पुणे यांनी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून बसचालक जोतिराम भीमराम जाधव (रा. गीतानगर, पणदरे, पुणे) याच्या बिरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे