Tasgaon News | तासगांव उपळावी- सांगली रस्त्यावर भीषण अपघात; 1 ठार
दुचाकीवरून भरधाव चारचाकीची जोरदार धडक
तासगाव -तासगांब तालुक्यातील उपळावी गावचे हद्दीत उपळावी ते सांगली जाणारे रोडवर दुचाकीस चारचाकी वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील आजी मयत झाल्या तर दुचाकी चालवणारा नातू जखमी झाला आहे. याप्रकरणी देण्यात आलेल्या फिर्यादी वरून चारचाकी वाहन चालकाविरूध्द तासगांव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या फुलाबाई बाजीराव शिंदे-७५ रा.उपळावी या मयत झाल्या आहेत. तर दुचाकीस्वार प्रथमेश कृष्णात शिंदे-१५ रा.उपळावी, ता. तासगांव हा जखमी झाला आहे. याप्रकरणी कृष्णात बाजीराव शिंदे रा.उपळावी, ता. तासगांव यांनी मच्छिंद्र पांडुरंग पाटील, रा. अंजनी, ता. तासगांव, यांच्या विरूध्द फिर्याद दिली आहे. ही घटना बुधवारी ४.३० च्या दरम्यान घडली. अपघाताची माहिती मिळताच फिर्यादी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे मुलगा प्रथमेश शिंदे यांनी अपघात कसा झाला याची माहिती फिर्यादी यांना दिली.
फिर्यादी यांच्या आई फुलाबाई शिंदे यांना फिर्यादी यांचा मुलगा प्रथमेश शिंदे हा फिर्यादी यांच्या मालकीच्या दुचाकी क्रमांक एचएफ डिलक्स एम.एच १०-डीयू-०८३१क्रमांक टाटा बरून घेऊन हरभरे पाहण्यासाठी जात होता. गुंडा कोळी यांच्या घराकडे दुचाकी वळण घेतलेले असताना अचानक सांगलीहुन उपळावीकडे येणाऱ्या चारचाकी नेक्सॉन एम.एच १०-डीक्यू-२४२८ चे चालक मच्छिंद्र पाटील यांनी भरधाव वेगात येऊन दुचाकीस जोराची धडक दिली.
यामध्ये फुलाबाई शिंदे यांच्या डोकीस जखम होऊन त्या बेशुध्द पडल्या होत्या. तर प्रथमेश याच्या उजवे हाताला व उजवे पायाला खरचटले त्याच्यावर गावातीलच दवाखान्यात उपचार करण्यात आले.
तर फुलाबाई शिंदे यांना टाटा नेक्सॉन चारचाकी गाडीतून घेवुन समर्थ हॉस्पिल, सांगली येथे दाखल केले. उपचारा दरम्यान गुरूवार दि. २६ फेब्रुवारी रोजी ३.०४ वाजता त्या मयत झाल्या. याप्रकरणी देण्यात आलेल्या फिर्यादी वरून संबधित चारचाकी चालक यांच्या विरूध्द रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, भरधाव वेगाने हयगईने चारचाकी बाहन चालवून मोटरसायकलला जोराची धडक देवुन अपघात करून अपघातामध्ये फिर्यादी यांच्या आई फुलाबाई शिंदे, यांच्या मृत्यूस कारणीभुत झाले. प्रकरणी तसेच फिर्यादी यांचा मुलगा प्रथमेश शिंदे यास किरकोळ जखमी केले प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.