Palus Accident | पलूस-आमणापूर मार्गावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
12:50 PM May 12, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
पलूसमध्ये भीषण रस्ता अपघात
Advertisement
पलूस : पलूस-आमणापूर मार्गावरसोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एका अनोळखी दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हॉटेल रॉयलजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे चाळीस वर्षांचा इसम दुचाकीवरून आमणापूरच्या दिशेने जात होता.
दरम्यान, हॉटेल रॉयलजवळ समोरून येणाऱ्या ट्रक व त्याच्यामोटारसायकलची जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याचा जागीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच पलूस पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. मृत व्यक्तीची ओळख रात्री उशिरापर्यंत पटू शकली नव्हती. त्यामुळे पोलिसांकडून त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू होते.
Advertisement
Advertisement