For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुरुंदवाड बायपासवर भीषण अपघात! ट्रॅक्टरला दुचाकीची पाठीमागून धडक, दोघे गंभीर जखमी

02:12 PM Apr 03, 2026 IST | NEETA POTDAR
कुरुंदवाड बायपासवर भीषण अपघात  ट्रॅक्टरला दुचाकीची पाठीमागून धडक  दोघे गंभीर जखमी
Advertisement

                       कुरुंदवाडजवळ ट्रॅक्टर-दुचाकी भीषण अपघात

Advertisement

कुरुंदवाड - कुरुंदवाड येथील बायपास रस्त्यावर ट्रॅक्टर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. विजय गुंडाप्पा कोळी (वय ४७) व अनिल तातोबा मालगावे (वय ५२, दोघे रा. शेडशाळ, ता. शिरोळ)अशी जखमींची नावे आहेत.

ही घटना सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास सलगरसदलगा महामार्गावरील राघवेंद्र टॉकीजजवळ घडली. टनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, वीट भट्टीकडे जाणारा ट्रॅक्टर पुढे जात असताना नृसिंहवाडीच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने ट्रॅक्टरच्या ठीमागून जोरदार धडक दिली.

Advertisement

या धडकेत दुचाकी ट्रॅक्टरच्या मागील रोटरला आदळल्याने अपघाताची तीव्रता वाढली. अपघातात दुचाकीवरील दोघे ही गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने एका खासगी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठीसांगली येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

दरम्यान, अपघातग्रस्त दोन्ही वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली असून, रात्री उशिरापर्यंत या घटनेची अधिकृत नोंद पोलीस ठाण्यात झालेली नव्हती. या अपघातामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Advertisement
Tags :

.