For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Accident | हुपरी-कोल्हापूर रोडवर भीषण अपघात; पेट्रोल भरून परतणाऱ्या तरुणाचा मृत्यू, मित्र गंभीर!

01:06 PM May 03, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur accident   हुपरी कोल्हापूर रोडवर भीषण अपघात  पेट्रोल भरून परतणाऱ्या तरुणाचा मृत्यू  मित्र गंभीर
Advertisement

                                  उचगावमध्ये भीषण अपघात

Advertisement

उचगाव -दुचाकी मध्ये पेट्रोल भरून घरी परतत असताना दुचाकी आणि चार चाकी यांची समोरासमोर धडक होऊन प्रेम सर्जेराव दाभाडे (वय २२ रा. गडमुडशिंगी ता. करवीर) या युवकाचा मृत्यू झाला. तर त्याचा मित्र सोहम संदीप सकटे (वय १६ रा. गडमुडशिंगी) हा गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास हुपरी- कोल्हापूर रोडवरील चेतन मोटर्स उचगाव येथे घडली. याबाबतची फिर्याद सचिन विलास चौगुले (वय २९ रा. कोल्हापूर) यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली.

याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी प्रेम आणि त्याचा मित्र सोहम हे आपल्या एम एच ०९-जी वाय ०५४७ या दुचाकीवरून उचगाव हद्दीत असणाऱ्या एका पेट्रोल पंपावर आपल्या दुचाकीत पेट्रोल भरून घरी परतत होते. त्यादरम्यान हुपरी कडून कोल्हापूर कडे भरधाव वेगाने निघालेली चार चाकी एम एच ०९ जी झेड ९२०३ या गाडीने चेतन मोटर्स जवळ समोरासमोर जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये प्रेम दाभाडे आणि सोहम सकटे यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्यादरम्यान गडमुडशिंगी चे माजी सरपंच जितेंद्र यशवंत आणि कार्यकर्त्यांनी त्यांना तात्काळ कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Advertisement

त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले त्यादरम्यान उपचार सुरू असताना प्रेम सर्जेराव दाभाडे याचा पहाटे मृत्यू झाला. दरम्यान चार चाकी चालक सूर्यकांत राजेंद्र भोसले (वय ४५ रा . राजारामपुरी कोल्हापूर याच्या वरती गुन्हा दाखल झाला असून त्याला गांधीनगर पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी करीत आहेत.

Advertisement
Tags :

.