Sangli Accident | विजापूर-गुहागर महामार्गावर भीषण अपघात; कंटेनर आणि सिमेंट मिक्सरच्या धडकेत दोन चालक गंभीर
बालगाव पुलावर भीषण अपघात
उमदी : विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील बालगाव पुलावर आज दोन मोठ्या वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. नागालैंड पासिंगचा कंटेनर आणि सिमेंट मिक्सर ग्राइंडर यांच्यात झालेल्या या धडकेत दोन्ही गाड्यांचे चालक गंभीर जखमी झाले असून, एका चालकाच्या हातापायाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
आणि १२ कंटेनर (क्र. NL-01-N-७४३३) टायर सिमेंट मिक्सर ग्राइंडर (क्र. KA-50-B-५५८९) हे दोन मोठी वाहने बालगाव पुलावर समोरासमोर धडकली. हा अपघात इतकाभीषण होता की, याचा मोठा आवाज जवळच असलेल्या बालगाव आणि हळी गावापर्यंत ऐकू आला. आवाज ऐकताच परिसरातील ग्रामस्थांनी मदतीसाठी घटनास्थळाकडे धाव घेतली.
अपघातग्रस्त कंटेनरमध्येचालक आणि त्याचा मुलगा प्रवास करत होते. या धडकेत चालकाचा एक हात आणि एक पाय चिरडला गेल्याने त्यांचा चक्काचूर झाला आहे.
दोन्ही गाड्यांच्या केबिनचा चक्काचूर झाल्यामुळे चालकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनामोठे प्रयत्न करावे लागले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच उमदी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेने उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात रवाना केले आहे.
दोन्ही चालकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींची नावे अद्याप समजू शकली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला सारून रस्ता मोकळा केला आहे.