For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News | आष्टा-सांगली मार्गावर भीषण अपघात; दुचाकीच्या धडकेत तरुण ठार

03:05 PM Aug 26, 2026 IST | NEETA POTDAR
sangli news   आष्टा सांगली मार्गावर भीषण अपघात  दुचाकीच्या धडकेत तरुण ठार
Advertisement

आष्टा : रस्ता ओलांडणाऱ्यापादचाऱ्याला भरधाव दुचाकीने जोरदार घडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ३४ वर्षीय तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.मिरजवाडी (ता. वाळवा) येथील 'शिवश्री महाई सेवा केंद्रा' समोर, आष्टा ते सांगली जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

Advertisement

प्रमोद मोहन पाटील (वय ३४, रा. मिरजवाडी, ता. बाळवा, जि. सांगली) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी फिर्यादी निखील बाबुराव माने (वय ३३, रा. मिरजवाडी) यांनी आष्ठा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून दुचाकी चालक आरोपी अजिंक्य राजू शिंगे (रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास प्रमोद पाटील हे मिरजवाडी येथील शिवश्री महाई सेवा केंद्रासमोरील रस्ता पायी ओलांडत होते. यावेळी आरोपी अजिंक्य शिंगे याने आपल्या ताब्यातील एलएमएल फ्रीडम कंपनीची मोटरसायकल (क्र. MH ०९ AM ८७२८) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, हयगयीने चालवून प्रमोद पाटील यांना जोराची धडक दिली. या धडकेमुळे प्रमोद पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

Advertisement

या अपघातानंतर त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल), सांगली येथे दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या अपघातात दुचाकीचालक आरोपी अजिंक्य शिंगे हादेखील स्वत किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेची नोंद आष्टा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Advertisement
Tags :

.