For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Pune Bangalore Highway | पुणे-बंगळूर महामार्गावर शिरोलीजवळ भीषण अपघात; १३ आयटी कर्मचारी जखमी

01:11 PM Aug 25, 2026 IST | NEETA POTDAR
pune bangalore highway   पुणे बंगळूर महामार्गावर शिरोलीजवळ भीषण अपघात  १३ आयटी कर्मचारी जखमी
Advertisement

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथील सांगली फाटा नजीक सोमवारी पहाटेच्या सुमारास एक अपघात घडला. कर्नाटकातील देवदर्शन उरकून पुण्याकडे परतणाऱ्या आयटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मिनी ट्रॅव्हल्सला हा अपघात झाला. चालकाला अचानक डुलकी लागल्याने गाडीवरील ताबा सुटला आणि ट्रॅव्हल्स समोर चाललेल्या ट्रेलरला मागून जोरात धडकली. या अपघातात १३ प्रवासी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील

Advertisement

असलेले कर्मचारी कर्नाटकातील गोकर्ण महाबळेश्वर व अन्य ठिकाणी देवदर्शनासाठी गेले होते.दर्शन पूर्ण करून ते मिनी ट्रॅ व्हल्सने पुण्याकडे परतत असताना तावडे हॉटेलजवळील पंचगंगा नदीचा पूल ओलांडून सांगली फाट्यानजीक पटेल हॉलसमोर आले. यावेळी पहाटेच्या सुमारास चालकाला डुलकी आल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले आणि मिनी ट्रॅव्हल्स समोर चाललेल्या ट्रेलरला पाठीमागून जाऊन धडकली. या धडकेमुळे ट्रॅव्हल्स थेट सेवा रस्त्यावर (सर्व्हिस रोड) जाऊन आदळली आणि पुढच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातातील जखमींची नावे अशी, १. सायली शिंदे (वय २१, रा. संगमनेर), २. पवन शिंदे (वय २४, रा. संगमनेर), ३. मोनाली गरपवार (वय ४९, रा. पुणे), ४. मयुरी देवरे (वय २१, रा. अहिल्यानगर), ५. सुरभी बांगी (बय ३०, रा. पुणे), ६. माधुरी मोहिते (बय

३०, रा. पुणे), ७. प्रतीक्षा गायकवाड (वय २६, रा. पुणे), ८. सुलक्षणी गायकवाड (वय २३, रा. कळवा, ठाणे), ९. आदेश इंगळे (वय २२, रा. पुणे), १०. गणेश दबरे (बय ३०, रा. अहिल्यानगर), ११. राज शिंकाले (वय २४, रा. नाशिक), १२. अनिकेत डोलारे (वय २३, रा. पुणे), १३. प्रवीण शिंदे (वय २३, रा. पुणे).

Advertisement

घटना घडताच शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना ट्रॅव्हल्समधून बाहेर काढून तत्काळ उपचारासाठी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) दाखल केले. या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकी व शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे.

Advertisement
Tags :

.