For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ईश्वरपूरजवळ भीषण अपघात : ट्रॅक्टर-ट्रॉलीला दुचाकीची धडक, दोन युवकांचा जागीच मृत्यू

03:28 PM Jan 30, 2026 IST | NEETA POTDAR
ईश्वरपूरजवळ भीषण अपघात   ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीची धडक  दोन युवकांचा जागीच मृत्यू
Advertisement

                                 शिराळा तालुक्यातील दोन तरुणांचा मृत्यू

Advertisement

ईश्वरपूर : पेठ-शिराळा मार्गावर रेठरे धरण येथील तलावाजवळील शेतकरी मठका मिसळ जवळ ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीस पाठीमागून धडक देवून झालेल्या अपघातात शिराळा तालुक्यातील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला ही घटना बुधवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

पवन सुरेश कदम (२२ रा. कदमवाडी शिराळा) व अभिषेक अमर रजपूत (२१, रा.शिराळा), अशी मृत युवकांची नावे आहेत. आरळे तालुका पन्हाळायेथील अमोल गायकवाड यांची ट्रॅक्टर-ट्रॉली विश्वास सह साखर कारखान्यास ऊस वाहतुकीसाठी आहे.त्यावर चालक म्हणून बाबासो सर्जेराव पाटील हे आहेत. लिंब (आळते, ता. तासगाव) येथील शेतकरी स्वप्निल पाटील यांचा ऊस भरून पाटील हे चालले होते. रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास ते तलावा जवळ चढाने ट्रॅक्टर-ट्रॉली घेवून जात होते.

Advertisement

या अपघातानंतर आजुबाजूच्या लोकांनी रुग्णवाहिका बोलावून ईश्वरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र तत्पुर्वीचा त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी ट्रॅक्टर चालक पाटील यांनी फिर्याद दिली आहे. क्रमांक एम एच १० ई एस १५६७ ने ट्रॉलीच्या उजव्या बाजूस जोराची धडक दिली. या मोटर सायकलसह दुचाकीस्वार परदेश व कदम हे काही अंतर फरफटत गेले. या मध्ये ते गंभीर जखमी झाले.

Advertisement
Tags :

.